IPL Auction 2025 Live

Indian Idol Marathi: पनवेलचा सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विजेता

'गाडीवान दादा' असं टोपणनाव पडलेल्या सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे.

Sagar Mhatre (Photo Credit - Instagram)

सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील 'इंडियन आयडल मराठी' (Indion Idol Marathi)  या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात घर केलं. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला असून पनवेलचा सागर म्हात्रे (Sagar Mahatre) विजेता ठरला आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे पेशाने इंजिनियर असला तरीही त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. 'गाडीवान दादा' असं टोपणनाव पडलेल्या सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

स्पर्धेत टॉप 14 स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मेहेनत, जिद्द, रियाज या जोरावर परिक्षकांची व्हा व्हा मिळवत तब्बल 8 'झिंगाट परफॉर्मन्स' मिळवले. हिंदी, मराठी सर्वप्रकारची गाणी गात, दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या कौतुकासही सागर पात्र ठरला. (हे देखील वाचा: Amruta Pawar Engagement: 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' फेम अमृताचा पार पडला साखरपुडा; पहा फोटोज)

आता 'इंडियन आयडल मराठी' च्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली.