Rasika Sunil ने बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सह अत्यंत फिल्मी स्टाईलने केले Valentine's Day सेलिब्रेशन, Watch Video
रसिकाने या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
'माझ्या नव-याची बायको' फेम शनाया ऊर्फ रसिका सुनील (Rasika Sunil) हिने या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिचे चाहते तिला खूप मिस करत होते. रसिका आपल्याला कधी पाहायला मिळणार की कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून ती आपल्यासमोर येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. मात्र सोशल मिडियावर रसिका आपल्या चाहत्यांसोबत जोडलेली होती. त्यात तिने सोशल मिडियावर आपण आदित्य बिलागी (Aditya Bilagi) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर करताच अनेक तरुणांचे हृदयाचे तुकडे झाले असतील हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यात आज व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) दिवसानिमित्त रसिकाने आपल्या बॉयफ्रेंडसह अनोख्या अंदाजात या दिवसाचे सेलिब्रेशन केले आहे.
रसिका आणि आदित्य बिलागीने अतिशय फिल्मी स्टाईलने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन केले आहे. रसिकाने या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.हेदेखील वाचा- Rasika Sunil करतेय 'या' मुलाला करतेय डेट, रिलेशनशिपबाबत अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
या व्हिडिओमध्ये रसिका आणि आदित्य शॅम्पेन फोडताना दिसत आहे. हे दोघे कुठच्यातरी डोंगरावर हे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. त्यांच्यामागे हेलिकॉप्टरही दिसत आहे. यात रसिका सुनीलने काळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसली असून यात ती खूपच हॉट दिसत आहे.
'माझा कायमचा व्हॅलेंटाईन आदित्य बिलागी..आम्हा दोघांकडून तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम आणि व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा' असे रसिकाने या पोस्टखाली लिहिले आहे.
दोन वर्षांपूर्वी रसिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची आदित्यशी ओळख झाली असून या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे.