Ramayan पुन्हा एकदा पाहण्याची संधी, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
रामायण 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यात आले होते.
रामानंद सागर यांचा लोकप्रिय शो रामायण (Ramayan) पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहण्यासाठी सुरु केली जाणार आहे. रामायण 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यात आले होते. गेल्या वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू केल्यानंतर ते टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा सुरु केले गेले. तेव्हा सुद्धा रामायण कार्यक्रमाने आपला रेकॉर्ड ब्रेक केला होता. रामायण गाथाच्या संपूर्ण कलाकारांची टीम संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. यामध्ये अरुण गोविल यांनी प्रभु श्रीराम, दीपिका चिखलिया यांनी माता सीता आणि सुनील लहरी यांनी लक्ष्मणाची भुमिका पार पाडली आहे. तर अरविंद त्रिवेदी यांनी रावण आणि दारा सिंह यांनी हनुमानाची भुमिका साकारली होती. आज सुद्धा लोकांना रामायण पाहणे पसंद करतात.
रामायण आता येत्या गुरुवारी कलर्स चॅनलवर प्रदर्शित केले जाणार आहे. रामायण प्रभु श्रीराम याच्या जीवनाशी प्रेरित आहे. यासाठी काही एपिसोड्स सुद्धा तयार करण्यात आले. दरम्यान, 2020 मध्ये ते शॉर्ट करण्यात आले. तरीही लोकप्रियता त्याची कायम होती. हिच गोष्ट लक्षात घेता कलर्स चॅनलने पुन्हा एकदा रामायण टीव्हीवर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.(शालेय पाठ्यपुस्तकात छापला Sushant Singh Rajput चा फोटो; लहान मुलांसाठी आदर्श बनला दिवगंत अभिनेता)
अरुण गोविल यांनी काही शो मध्ये काम केले आहे.तर दीपिका चिखलिया यांनी काही चित्रपटात भुमिका साकारल्या आहेत. तिघांनी रामायणाची विशेषता सुद्धा सांगितली होती. यामध्ये काही ना काही तरी शिकण्यास मिळणार असल्याचे ही म्हटले. रामायण रामानंद सागर यांनी अत्यंत विस्तारपणे तयार केले आहे. यामधील प्रत्येक पात्र सजीव करण्याच प्रयत्न करण्यात आला आहे.