Karan Mehra-Nisha Rawal वादावर Rakhi Sawant ने दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाली
तसेच करण आणि निशातील विकोपाला गेलेले भांडण पाहून माझा प्रेमावर आणि लग्नावरचा विश्वासच उडाला आहे असेही राखी सावंतने सांगितले.
टीव्ही अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) यांच्यातील वादाची सोशल मिडियावर बरीच चर्चा आहे. त्याचे कलाकार मित्रपरिवार या दोघांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया देखील देत आहे. दरम्यान तोंडाने फटकळ असलेल्या राखी सावंतने (Rakhi Sawant) देखील या दोघांच्या नात्याबद्दल आणि त्यांचे वेगळे होण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 'ही घटना आपल्यासाठी खूप धक्कादायक आहे' अशी राखी मिडियाशी बोलताना म्हणाली. तसेच करण आणि निशातील विकोपाला गेलेले भांडण पाहून माझा प्रेमावर आणि लग्नावरचा विश्वासच उडाला आहे असेही राखी सावंतने सांगितले.
'मी त्या दोघांसोबत 4 वर्षांपूर्वी अमेरिकेला गेले होते. ही खूप चांगली जोडी होती. निशाने करणसाठी खूप करवा चौथचे व्रत केले होते. हातावर मेहंदी काढली होती. त्यांचे असे वेगळे होणे ही खूप दु:खद घटना आहे. त्यांना छोटा मुलगा सुद्धा आहे.' असे राखीने मिडियाशी बोलताना सांगितले.हेदेखील वाचा- Karan Mehra विरुद्ध FIR दाखल केल्यानंतर पत्नी Nisha Rawal आली मिडियासमोर, पतीवर लावले 'हे' गंभीर आरोप
'निशाला मारहाण झालेले आणि रक्तबंबाळ झालेले फोटो पाहून आपले मन विषिन्न झाले' असेही तिने मिडियाशी बोलताना सांगितले.
दरम्यान करण- निशा प्रकरणात निशाने मिडियाला दिलेल्या माहितीनुसार, करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. ती आपल्या मुलासाठी करणसोबत राहत होती. मात्र या दोघांमध्ये फार तणाव होते. ज्यानंतर ह्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र आता तिने करणने आपल्याला मारहाण केल्याचा तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. मिडियाशी बोलताना निशा खूप भावूक झाली होती.