Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव यांचा MRI रिपोर्ट आला समोर; मेंदूच्या वरच्या भागात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाली जखम

राजू श्रीवास्तव यांच्या एमआरआय अहवालानुसार त्यांच्या मेंदूच्या खालच्या भागात कमी नुकसान झाले आहे.

Raju Srivastava | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Raju Srivastava Health Update: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांना बुधवारी वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, अशी चाहत्यांची इच्छा आहे. राजूच्या प्रकृतीबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. राजू श्रीवास्तव यांचा एमआरआय रिपोर्ट समोर आला असून त्यात त्यांच्या मेंदूच्या एका भागात दुखापत झाल्याचं आढळून आलं आहे. मेंदूतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही दुखापत झाली असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी सायंकाळी उशिरा राजू श्रीवास्तव यांना एमआरआयसाठी व्हेंटिलेटर रूममधून नेण्यात आले. एमआरआय अहवालात राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूच्या भागात दुखापत आढळून आली. हे स्पॉट्स जखमा असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा आणि इतर वैद्यकीय उपायांसह मेंदूतील हे डाग सामान्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रिकव्हरीचा वेळ अतिशय कमी आहे. परंतु, रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. राजू यांना शुद्धीवर येण्यासाठी एक ते दोन आठवडे लागू शकतात. (हेही वाचा - Rajinikanth यांनी चाहत्यांना अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्याची केली विनंती (Watch Video))

दरम्यान, एमआरआयमध्ये दिसून आल्याप्रमाणे ही दुखापत 10 तारखेला जीममध्ये बेशुद्ध पडल्यानंतर सुमारे 25 मिनिटे ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे झाली. खरं तर हृदयविकाराच्या झटक्याबरोबरच राजूची नाडी जवळपास बंद झाली होती. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे मेंदूचा हा भाग खराब झाला आहे.

याशिवाय, राजू श्रीवास्तव यांच्या एमआरआय अहवालानुसार त्यांच्या मेंदूच्या खालच्या भागात कमी नुकसान झाले आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून राजूच्या हात, पाय, बुबुळ आणि घशात काही हालचाल दिसून येत आहे. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार केवळ डोळ्याची रेटिनल हालचाल होणं आवश्यक आहे. त्यासाठी आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे.

राजू श्रीवास्तव यांचे अनेक चाहते, जुने मित्र आणि इतर काही ओळखीचे लोक गेल्या दोन दिवसांपासून राजूच्या कुटुंबीयांना एअरलिफ्ट करून सिंगापूर किंवा परदेशातील अन्य चांगल्या रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी दाखल करण्याची विनंती करत होते. मात्र, राजूच्या पत्नी सौ मोनी श्रीवास्तव यांनी हे स्पष्ट केले आहे की, त्यांना त्यांच्या पतीवर एम्समध्ये उपचार करायचे आहेत. कारण, त्यांचा एम्सच्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. राजूच्या पत्नीने सांगितले की, डॉ. हर्षवर्धन हे त्यांचे कौटुंबिक मित्र आहेत आणि त्यांनी असा सल्लाही दिला आहे की राजू श्रीवास्तव यांना ज्या प्रकारच्या उपचारांची आवश्यकता आहे त्यासाठी दिल्लीतील एम्स अद्वितीय आहे.