'या' टिलिव्हिजन अभिनेत्रीचा थोडक्यात वाचला जीव; दिवाळी साजरी करत असताना ड्रेसला लागली होती आग (See Photos)
तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असली तरी आता मात्र तिच्या फॅशनमुळेच तिच्यासोबत ऐन दिवाळीत एका दुर्घटना घडली.
हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक आघाडीचं नाव म्हणजे निया शर्मा (Nia Sharma). तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असली तरी आता मात्र तिच्या फॅशनमुळेच तिच्यासोबत ऐन दिवाळीत एका दुर्घटना घडली.
दिवाळी साजरी करत असताना अचानक नियाच्या ड्रेसला आग लागली असल्याची माहिती तिने तिच्या फॅन्सना दिली आहे. नियाने इंस्टाग्राम वर तिच्या ड्रेसचा फोटोसुद्धा शेअर केला आहे.
कशीबशी या आगीपासून निया बचावली असून तिच्या फॅन्सनी काळजी करत असल्याचे बरेच मेसेज तिला सोशल मीडियावर पाठवले आहेत.
पाहा नियाची पोस्ट
ती दिवाळीनिमित्त एका पार्टीमध्ये गेली होती. या पार्टीसाठी नियाने एक सिल्वर लेहंगा घातलेला होता. याच ड्रेसचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“दिव्यांची ताकद, एका सेकंदात आग लागली, पण माझ्या लेहंग्याला अनेक लेअर असल्याने मी वाचली, नाहीतर काही झाले असते”, असं नियाने एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले.
Aishwarya च्या मॅनेजर साठी Shah Rukh ठरला 'हिरो'; प्रसंगावधान राखून वाचवले प्राण
सध्या तिचा एका पार्टीतील व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गायक गुरु रंधावा डान्स करताना दिसत आहे व अनेक टीव्हीतील कलाकारांनी हजेरी लावलेली दिसून येते.