Kon Honaar Crorepati: 'कोण होणार करोडपती' या रिअॅलिटी शो साठी नागराज मंजुळे याने गायले रॅप सॉन्ग (Video)
या शो साठी नागराज याने एक रॅप सॉन्ग देखील गायले आहे.
Kon Honaar Crorepati: लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) लवकरच आपल्याला 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) या शो चे सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. या शो साठी नागराज याने एक रॅप सॉन्ग (Rap Song) देखील गायले आहे. या माध्यमातून नागराजचा अजून एक नवा पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोनी मराठीवर लवकरच रंगणार 'हॉट सीट' वरचा उत्कंठावर्धक खेळ, पहा पहिली झलक (Video)
श्रीरंग गोडबोले हे या गाण्याचे गीतकार असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि नागराज मंजुळे यांनी हे गाणे गायले आहे. तसंच ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शनही केले आहे.
खुद्द नागराज मंजुळे याने गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यापूर्वी या रिअॅलिटी मराठी गेम शोचं सूत्रसंचालन अभिनेता सचिन खेडेकर आणि स्वप्नील जोशी यांनी केलं होतं. आता नागराज मंजुळे यांच्या सुत्रसंचालनाखाली हा खेळ कसा रंगतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लवकरच सोनी मराठी वाहिनीवर हा लोकप्रिय रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.