Use A Mask: बबड्या मास्क लावतो, तो खरचं सुधारलायं; महाराष्ट्र पोलिसांचं सुचक ट्विट; Watch Photo

आवश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा, असं आवाहनदेखील पोलिस सतत करत आहेत. अशातचं आता महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) आपल्या ट्विटर हँडलवरून मास्क (Use A Mask) लावण्यासंदर्भात आवाहन केलं आहे.

Maharashtra Police tweeted a photo of Babdya (PC - Twitter)

Use A Mask: कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच पोलिसांकडून घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. आवश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा, असं आवाहनदेखील पोलिस सतत करत आहेत. अशातचं आता महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) आपल्या ट्विटर हँडलवरून मास्क (Use A Mask) लावण्यासंदर्भात आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी या ट्विटमध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील बबड्या हे पात्र दाखवलं आहे. या मालिकेत अभिनेता आशुतोष पत्की हा सोहम उर्फ ‘बबड्या’ची भूमिका साकारत आहे. या मालिकेत बबड्याचं पात्र नकारात्मक दाखवण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरी मुंबई पोलिसांनी बबड्याचा फोटो ट्विट करत 'बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही. परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीचं आहे,' असं म्हटलं आहे. (हेही वाचा - चित्रपट, मालिका, ओटीटी उद्योगातील 65 वर्षांवरील कलाकारांना चित्रीकरणाची परवानगी- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती)

पोलिसांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये बबड्याने मास्क घातला आहे. 'बबड्या मास्क लावतो, बबड्या खरचं सुधारला आहे,' असंही पोलिसांनी म्हटलं आहे. या ट्विटमध्ये सुरूवातीला महाराष्ट्र पोलिसांनी ‘कथानकात ‘ट्विस्ट’ आहे! असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंचं व्हायरल होत आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. नागरिकांना घरात राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा, यासाठी पोलिसांनी यापूर्वीदेखील अनेक मजेशीर ट्विट, मीम्स, कविता, गाण्याच्या माध्यमातून आवाहन केलं आहे.