दूरदर्शनवर आता बालकांचे मनोरंजन करण्यासाठी छोटा भीम भेटीला, 'या' वेळी होणार प्रक्षेपण

यामध्ये खासकरुन 'रामायण' (Ramayana) आणि 'महाभारत;' (Mahabharat) कार्यक्रमाला सर्वांची पसंती मिळत आहे. तर 2008 मध्ये पहिल्यांचा प्रक्षेपण करण्यात आलेले कार्टून 'छोटा भीम' (Chhota Bheem) आता दूरदर्शवनवर सुद्धा दाखवले जाणार आहे.

Chhota Bheem (Photo Credits-Twitter)

देशभरात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधाच सुरु राहणार आहेत. मात्र नागरिकांना लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे घरात बसून कंटाळलेल्या नागरिकांसाठी डीडी नॅशनल चॅनलने त्यांचे प्रसिद्ध दोन शो सुरु केले आहेत. या दरम्यान दूरदर्शनवर 90 च्या काळातील जुन्या टीव्ही मालिका पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये खासकरुन 'रामायण' (Ramayana) आणि 'महाभारत;' (Mahabharat) कार्यक्रमाला सर्वांची पसंती मिळत आहे. तर 2008 मध्ये पहिल्यांचा प्रक्षेपण करण्यात आलेले कार्टून 'छोटा भीम' (Chhota Bheem) आता दूरदर्शवनवर सुद्धा दाखवले जाणार आहे. डीडी नॅशनल (DD National) यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन या संदर्भात माहिती दिली आहे.

छोटा भीम हे कार्टून लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झाले होते. वार्नर मीडियाच्या मालकीचे पोगो (Pogo) चॅनल सोबत पार्टरनशिपमध्ये दूरदर्शनवर छोटा भीम कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. याची वेळ दररोज दुपारी 2 वाजता असून बालकांना तो पाहता येणार आहे. छोटा भीमच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लॉकडाउन संपूर्ण होण्याचा कालावधी म्हणजेच 3 मे पर्यंत सुरु राहणार आहे.(Coronavirus Lockdown मध्ये दूरदर्शन TRP मध्ये अव्वल; रामायण, महाभारत या मालिकांमुळे प्रेक्षकांची डीडी नॅशनल चॅनलला पसंती)

दूरदर्शनवर प्रक्षेपण करण्यात येणारे 90 च्या काळातील महाभारत आणि रामायण सध्या घरोघरी बहुसंख्येने पाहिले जाते. तसेच मुकेश खन्ना यांचा शक्तीमान कार्यक्रम सुद्धा लहान मुलांच्या पसंतीस पडत आहे. त्याचसोबत श्रीमान-श्रीमति, चाणाक्य, शाहरुख खान याची सर्कस, ब्योमकेश बक्शी, हम हैं ना, दूरदर्शनवर प्रक्षेपित केले जात आहेत. आता प्रेक्षकांकडून चंद्रकांता दूरदर्शनवर पुन्हा दाखवले जावे अशी मागणी केली जात आहे.