'लागिरं झालं जी' फेम अज्या चे 'हे' Reels व्हिडिओ तुम्ही पाहिले का? नितीश चव्हाण चा हटके अंदाज पाहून चाहते झाले फिदा
हे व्हडिओज तिचे चाहतेही प्रचंड पसंत करत आहेत.
लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तसेच स्वत:चे मनोरंजन करण्यासाठीही अनेकांनी Reels व्हिडिओज बनविण्याचा नवा पर्याय शोधून काढला आहे. सेलिब्रिटींजचे रिल्स व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. जे सेलिब्रिटी सध्या रुपरे पडद्यापासून दूर आहेत त्यांचे चाहते त्यांना रिल्स व्हिडिओ बनविण्याचा आग्रह करतात. याच आग्रहास्तव सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असलेला 'लागिरं झालं जी' फेम अज्या म्हणजेच नितीश चव्हाणने (Nitish Chavan) आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडिओज बनवले आहेत. हे व्हिडिओज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओजमध्ये नितीश इंग्रजी गाण्यावर, मराठी तसेच हिंदी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हे व्हडिओज तिचे चाहतेही प्रचंड पसंत करत आहेत.
नितीशच्या काही व्हिडिओज मध्ये त्याची मैत्रिण श्वेता खरात हिने साथ दिली आहे.हेदेखील वाचा- Star Pravah च्या कलाकारांना #VaathiComing चे लागले वेड, पाहा तुमच्या आवडत्या स्टार्सचे मजेशीर व्हिडिओज
श्वेता खरात ही सध्या 'राजा राणीची ग जोडी' या मालिकेत संजूच्या मैत्रिणीची म्हणजेच मोनीची भूमिका साकारत आहे.
नितीश आणि श्वेताचा रुपेरी वाळूत या गाण्यावर बनवलेला रिल व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.
लागिरं झालं जी या मालिकेत नितीश चव्हाण अजिंक्य शिंदे ची भूमिका साकारली होती. यात तो भारतीय जवानाच्या भूमिकेत होता. ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच यातील अज्या आणि शितलीची जोडी देखील हिट झाली होती.