कोण आहे कलर्स मराठीच्या ‘स्वामिनी’ मालिकेतील मोठी रमा? पहा ‘रेवती लेले'च्या खऱ्या जीवनातील तिचे काही मनमोहक फोटोज (See Photos)
मराठीमध्ये ऐतिहासिक मालिकांची फार मोठी परंपरा आहे. अगदी ‘राऊ’ पासून ‘स्वराज्य रक्षक संभाजी’पर्यंत अनेक उत्तम अशा ऐतिहासिक मालिका मराठी प्रेक्षकांनी पहिल्या आहेत. सध्या कलर्स मराठीवर अशीच एक ऐतिहासिक मालिका चालू आहे ती म्हणजे ‘स्वामिनी’ (Swamini). रमा आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे.
मराठीमध्ये ऐतिहासिक मालिकांची फार मोठी परंपरा आहे. अगदी ‘राऊ’ पासून ‘स्वराज्य रक्षक संभाजी’पर्यंत अनेक उत्तम अशा ऐतिहासिक मालिका मराठी प्रेक्षकांनी पहिल्या आहेत. सध्या कलर्स मराठीवर अशीच एक ऐतिहासिक मालिका चालू आहे ती म्हणजे ‘स्वामिनी’ (Swamini). रमा आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. लॉक डाऊनमध्ये या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते मात्र आता ते परत सुरु झाले आहे. त्याच बरोबर छोटी रमा आता मोठी झाली आहे. अनेकांना उत्सुकता होती की ही नवी रमा कोण असेल, मात्र त्यावरून पडदा पडला आहे. रेवती लेले (Revati Lele) ही अभिनेत्री मोठ्या रमेची भूमिका साकारात आहे.
पहा फोटो -
मोठ्या रमेच्या एंट्रीचा सीन नुकताच पार पडला. सोशल मिडियावरील कमेंट्स पाहता हा सीन लोकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. अशात आज आम्ही तुम्ही या मोठ्या रामेबद्दल म्हणजेच रेवती लेलेबद्दल काही माहिती सांगणार आहोत. तर रेवती ही एक कथक डान्सर, अभिनेत्री व मॉडेल आहे. मुळची जळगावची असलेली रेवती सध्या मुंबईमध्ये वास्तव्याला आहे. (हेही वाचा: ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची टिंगल उडवणाऱ्या लोकांवर भडकले गिरीश ओक; म्हणाले- ‘तुमच्यासाठी जीवावर उदार होऊन शुटींगला जातो’, झाले ट्रोल)
इंस्टावर पोस्ट केलेल्या फोटोवरून अंदाज लावल्यास आदिश वैद्य या तिचा बॉयफ्रेंड आहे. 'स्वामिनी' ही तिची प्रमुख भूमिका असलेली पहिलीच मालिका आहे. व्हर्च्युअल माध्यमातून कास्टिंग प्रक्रिया घेऊन रेवतीची मोठी रमा म्हणून निवड करण्यात आली आहे.
View this post on Instagram
They call me the heartbreaker 💁🏼♀️ . . 📸 @sarrikaaaaaa 🧚🏻♀️ MUA @falgunikapasi_mua 🧚🏻♀️
A post shared by Revati Lele (@me_revati) on
दरम्यान, रमा व माधव यांच्या जीवनात गोपिकाबाई यांचे स्थान फार महत्वाचे राहिले आहे. या मालिकेत ऐश्वर्या नारकर ही भूमिका साकारत आहे. कदाचित पहिल्यांदाच ऐश्वर्या अशी नकारात्मक छटा असलेली भूमिका वठवत असाव्यात. आता रमा मोठी झाल्याने शनिवार वाड्यात नक्की काय राजकारण शिजेल व त्याला रमा कशी तोंड देईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)