Shweta Tiwari वर भडकला पती Abhinav Kohli; 4 वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये ठेऊन परदेशी गेली असल्याचा गंभीर आरोप (Watch Video)
मी मुलाचा फोटो घेऊन अनेक हॉटेल्समध्ये विचारणा केली आहे. मला माझा मुलगा कुठे आहे हे माहित नाही, तरी कृपया याबाबत कोणाला माहिती असल्यास माझ्याशी शेअर करा.
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) 'खतरों के खिलाड़ी 11' (Khatron Ke Khiladi 11) मध्ये दिसणार आहे. खतरों के खिलाडी सीझन 11 चे सर्व स्पर्धक शुटींगसाठी केपटाउनला (Cape Town) रवाना झाले आहेत. मात्र श्वेता तिवारी आपल्या स्टंट्सने लोकांना चकित करायच्या आधीच तिचा आधीचा नवरा अभिनव कोहलीने एक व्हिडीओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडविली आहे. अभिनव कोहलीने या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, श्वेता तिवारी आपल्या 4 वर्षांच्या मुलाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेऊन दक्षिण आफ्रिकेला गेली आहे.
श्वेता तिवारीचे केपटाउनला जाने अभिनव कोहलीला अजिबात आवडले नसल्याचे दिसून येत आहे. ती दक्षिण आफ्रिकेला गेल्याचा एकच दिवसांनतर अभिनवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत, आपला मुलगा रेयांशबाबत विचारपूस केली आहे. तो आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतो, ‘मी तुमच्या सर्वांना एक आवाहन करण्यासाठी लाइव्ह आलो आहे. श्वेता 'खतरों के खिलाडी' साठी दक्षिण आफ्रिकेला गेली आहे. श्वेताने काही दिवसांपूर्वी याबाबत माझे मत विचारले होते, पण मी नकार दिला. मात्र काल रात्री ती दक्षिण आफ्रिकेला गेली होती, परंतु माझा मुलगा कुठे आहे?’
व्हिडीओमध्ये अभिनवने सांगितले आहे की, ‘मुलाच्या माहितीसाठी मी पोलीस स्टेशनमध्येही गेलो मात्र तिथे योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मी मुलाचा फोटो घेऊन अनेक हॉटेल्समध्ये विचारणा केली आहे. मला माझा मुलगा कुठे आहे हे माहित नाही, तरी कृपया याबाबत कोणाला माहिती असल्यास माझ्याशी शेअर करा. सध्या कोरोना महामारी चालू आहे त्यात माझा मुलगा आजारी आहे मात्र श्वेता त्याला एकट्याला सोडून परदेशी निघून गेली आहे. जरा माझा मुलगा सापडला नाही, तर मला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.’ (हेही वाचा: लवकरच येणार स्टंट शो 'खतरों के खिलाड़ी’ चा 11वा सिझन; शुटींगसाठी केपटाऊनला रवाना झाले राहुल वैद्य, श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी (See Photos))
त्यानंतर नुकतेच अभिनवने अजून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामधून माहिती मिळत आहे की, श्वेताने अभिनवला त्यांचा मुलगा एका सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती दिली आहे. मात्र यावर पुन्हा अभिनव चिडला आहे व त्याने प्रश्न उपस्थित केला आहे की, मुलाला एका तिऱ्हाईत व्यक्तीकडे ठेवण्याऐवजी माझ्याकडे का नाही सोपवले? या व्हिडीओमध्ये अभिनवने श्वेताला हाय कोर्टामध्ये घेऊन जाण्याची धमकी दिली आहे.