Happy Birthday Hina Khan: जाणून घ्या हिनाच्या आयुष्यातील काही खास सिक्रेट्स
हिंदी टेलिव्हिजन विश्वातील कायमच चर्चेत असणारं नाव म्हणजे हिना खान. ये रिश्ता क्या केहलता हैं मधील अक्षराच्या रूपाने तिने साऱ्यांचीच मने जिंकली तर बिग बॉसमधील तिचा प्रवास प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला. याच ब्युटी क्वीनचा आज वाढदिवस आहे. तर तिच्या या खास दिवशी जाणून घेऊया तिचे काही खास सिक्रेट्स
कश्मीर की कली
हिनाला 'कश्मीर की कली' हा टॅग अगदी परफेक्ट शोभतो. कारण तिचं संपूर्ण बालपण हे काश्मीरमध्ये गेलं.
एक उच्चशिक्षित अभिनेत्री
हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ही एक उच्चशिक्षित अभिनेत्री आहे. तिने दिल्लीच्या सीसीए स्कुल ऑफ मानजमेंट मधून एमबीए केले आहे.
पत्रकार होण्याची इच्छा
हिनाला कायमच पत्रकार व्हायचे होते. तसे तिने अनेकदा मुलाखतींमध्ये बोलूनही दाखवले आहे.
View this post on Instagram
In a Gentle way, you can shake the world 💃
A post shared by Hina Khan (@realhinakhan) on
हिनाच्या बॅगमधील रहस्य
हिना कायम तिच्या बॅगमध्ये एक तावीज ठेवते. तिच्यासाठी ते लकी असल्याचं तिचं मत आहे.
मुंबईत येण्यामागचं खरं कारण
हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न घेऊन ती मुंबईत आली होती. तिने त्यासाठी एका संस्थेत प्रवेशाचा अर्जदेखील भरला होता. पण नंतर तिने अभिनयाकडे वळायचे ठरवले.