Gunratna Sadavarte and Bigg Boss: आई शप्पतच! 'डंके की चोटपर', गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसमध्ये एन्ट्री

यातील विविध स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरु झाली असतानाच, अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे नाव पुढे येत आहे. या कार्यक्रमासाठी पक्के मटेरियल असलेले असे हे व्यक्तीमत्व घरात काय धुमाखूळ घालणार याबाबत उत्सुकता आहे.

Gunratna Sadavarte | (File Image)

मराठी बिग बॉस 5 (Bigg Boss Marathi 5) शेवटचा आठवडा पूर्ण करुन फिनाले साजरा करतो आहे. त्यामुळे पुढच्या काहीच तासांमध्ये या कार्यक्रमाचा हा हंगाम संपत आहे. असे असले तरी, प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी हिंदी बिग बॉस आपला 18 वा हंगाम (Bigg Boss Season 18) घेऊन येत आहे. यातील विविध स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरु झाली असतानाच, अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे नाव पुढे येत आहे. या कार्यक्रमासाठी पक्के मटेरियल असलेले असे हे व्यक्तीमत्व घरात काय धुमाखूळ घालणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, स्वत: सदावर्ते यांनीही बिगबॉसच्या घरातील कथीत प्रवेशाबाबत दुजोरा दिला आहे.

गुणरत्न सदावर्ते आणि विक्षिप्तपणा: एक समिकरण

येन केन प्रकारेण महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारणात विविध कारणांसाठी चर्चेत असलेले गुणरत्न सदावर्ते हे सध्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत. उमेदवारीसाठी ते वरळी विधानसभा मतदारसंघ निवडू इच्छित असून, त्यासाठी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडे मागणी केली आहे. वरळी येथून शिवसेना (UBT) पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे हे सध्या आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात या दोनपैकी एक पक्ष सदावर्ते यांच्यावर डाव लावणार का? याबाबत उत्सुकत आहे. दरम्यानच, हिंदी बिग बॉस कार्यक्रमाची तारीखही निश्चित झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका आणि हा कार्यक्रम एकत्रच येण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी सदावर्ते काय निवडणार याबाबतही उत्सुकता आहे.

दरम्यान, आतापर्यंत विविध खटले, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे आरडाओरडा आणि विचित्र हावभाव करत बोलण्याची पद्धत यामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत असतात. आता त्यांना बिग बॉस 18 च्या हिंदी सिझनचे वेध लागले आहेत. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, स्वत: सदावर्ते यांनीही बिगबॉसमध्ये जाण्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कुतुहल आणि उत्सुकतेला प्रत्यक्ष बिगबॉस सुरु झाल्यानंततरच पूर्णविराम मिळणार आहे.

बिग बॉस हा एक खासगी टीव्ही वाहिनीवरील कार्यक्रम आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विविध स्पर्धकांना निवडले जाते. त्यांना एका घरात निश्चित वेळेसेसाठी (शक्यतो 100 दिवस) बंद केले जाते. त्यांचा समाजापासूनचा संपर्क खंडीत केला जातो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावभावनांचा वर्तनाचा अर्थ लावला जातो. त्यांच्या वर्तनाचे मनोविश्लेषन केले जाते. ज्यामुळे घरातील स्पर्धक निसर्गत: कसा आहे. त्याचा मानवी स्वभाव, व्यवहार कसा आहे, हे पुढे येतो. याशिवाय त्यांना घरामध्ये वेगवेगळे टास्कही दिले जातात. ज्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते.