Happy Birthday Nilesh Sable: डॉ. निलेश साबळे यांचा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' चा विजेता ते 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा सूत्रसंचालक या यशस्वी प्रवासाविषयी काही खास गोष्टी!
इतकेच नाही तर या कार्यक्रमाचा तो विजेतासुद्धा ठरला आणि त्यानंतर सुरु झाला अभिनय क्षेत्रातील खरा प्रवास!
'कसे आहात सगळे, मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे' हे एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपली स्वत:ची ओळख निर्माण करणा-या आणि झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hava Yeu Dya) या कार्यक्रमातून लोकांना हसवून लोटपोट करणा-या डॉ. निलेश साबळे (Dr.Nilesh Sable) यांचा आज जन्मदिवस. व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असणारे निलेश साबळे आज एका यशस्वी कार्यक्रमाचे एक यशस्वी सूत्रसंचालक आणि लेख देखील आहेत. झी मराठीवरील (Zee Marathi) 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' चा विजेता ते चला हवा येऊ द्या यशस्वी घोडदौड थक्क करणारी आहे.
30 जून 1986 रोजी पुण्यातील सासवड येथे निलेश साबळे यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. मात्र हे क्षेत्र सामान्यांसाठी असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते. आपल्याला डॉक्टर होता आले नाही मात्र आपले मुलाने डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. निलेश साबळेंनी देखील हे स्वप्न सत्यात उतरवले. मात्र अभिनयाची आवड त्यांना काही त्या क्षेत्रापासून दूर करु शकली नाही. शेवटी त्यांच्या वडिलांनीच त्याला या क्षेत्रात जाण्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार त्याने गिरीश मोहितेच्या ‘नान्याच्या गावाला जाऊ या…’या मालिकेत काम केले. त्यानंतर झी टीव्हीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमासाठी ऑडिशन दिली आणि तो निवडला गेला. इतकेच नाही तर या कार्यक्रमाचा तो विजेतासुद्धा ठरला आणि त्यानंतर सुरु झाला अभिनय क्षेत्रातील खरा प्रवास!
त्यानंतर डॉ. निलेश साबळे यांनी ‘होम मिनिस्टर’, ‘फू बाई फू’ या शोजमध्ये तो झळकला. शिवाय ‘नवरा माझा भवरा’, ‘बुध्दीबळ’, ‘एक मोहर अबोल’या सिनेमांमध्ये निलेश सबाळे झळकले. त्यानंतर 'चला हवा येऊ द्या' च्या कार्यक्रमातून आला त्यांच्या आयुष्यात आला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट.
भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे या हास्य दुनियेतील अवलियांना घेऊन 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सुरु केला. 2014 मध्ये सुरु केलेल्या या कार्यक्रमाने निलेश यांना उत्तम सूत्रसंचालक, लेखक आणि नकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाची न केवळ मराठी सिनेसृष्टीला तर बॉलिवूडला भुरळ पडली. ज्याच्या जोरावर मराठी कलाकारांसोबत शाहरुख खान, काजोल, दीपिका पादुकोण, गोविंदा यांसारखे अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. आपल्या कार्यक्रमाला यशाच्या उंच शिखरावर पोहोचविणा-या डॉ. निलेश साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!