Bigg Boss Marathi 5 Full Contestants List: बिग बॉस मराठीच्या 5 व्या सिझनला सुरुवात; वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळीसह 16 स्पर्धकांची एन्ट्री, जाणून घ्या संपूर्ण यादी

आता काल पार पडलेल्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे. जाणून घ्या यावेळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात सामील झालेल्या 16 स्पर्धकांची नावे.

Nikki Tamboli, Riteish Deshmukh, Arbaz Patel (Photo Credits: Instagram)

Bigg Boss Marathi 5 Full Contestants List: हिंदी बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या शोच्या फिनालेला फक्त 4 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, प्रेक्षकांचे मनोरंजन चालू ठेवण्यासाठी निर्मात्यांनी बिग बॉस मराठीचा 5 वा (Bigg Boss Marathi 5) सीझन आणला आहे. काल रात्री, रविवार, 28 जुलै रोजी बिग बॉस मराठी 5 कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाला. यावेळी हा शो महेश मांजरेकर यांच्याऐवजी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे. या शोच्या प्रीमियरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून यंदा बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून कोण जाणार याबाबत उत्सुकता होती. आता काल पार पडलेल्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे. जाणून घ्या यावेळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात सामील झालेल्या 16 स्पर्धकांची नावे-

वर्षा उसगांवकर-  80 आणि 90 च्या दशकात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी मराठी अभिनेत्री.

कोकण हार्टेड गर्ल- मराठी इंफ्लुएंसर

निखिल दामले- टीव्ही अभिनेता

पंढरीनाथ कांबळे- मराठी विनोदी अभिनेता

योगिता चव्हाण- टीव्ही अभिनेत्री

जान्हवी किल्लेकर- टीव्ही-चित्रपट अभिनेत्री

अभिजीत सावंत- गायक आणि इंडियन आयडॉल सीझन 1 चा विजेता

घन:श्याम दरवडे- राजकारणाची जाण असलेला छोटा पुढारी

इरिना रूडाकोवा- मॉडेल आणि अभिनेत्री

निकी तांबोळी- अभिनेत्री आणि 'बिग बॉस 14' ची उपविजेती

अरबाज पटेल- इंफ्लुएंसर आणि 'स्प्लिट्सविला X5' चा माजी स्पर्धक

वैभव चव्हाण- टीव्ही अभिनेता

आर्या जाधव- प्रसिद्ध रॅपर

धनंजय पोवार- इंफ्लुएंसर

पुरुषोत्तमदादा पाटील- प्रसिद्ध गायक आणि कवी

सूरज चव्हाण- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रसिद्ध व्लॉगर (हेही वाचा: Rinku Rajguru: रिंकु राजगुरुने खरेदी केली नवी कार; पाहा फोटो)

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या 5 व्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’ शो रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.