Bigg Boss Marathi 5 Finale Week: बिग बॉस मराठी 5 हंगामाचा 10 वा आठवडा; फिनालेपूर्वी दुसऱ्या क्रमांकावर कोण?

बिग बॉस मराठी 5 च्या अंतिम आठवड्यात जान्हवी किलेकर आणि वर्षा उसगावकर यांना तळाशी असलेल्या दोनमध्ये टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रँड फिनाले जवळ येत असताना आठवड्याच्या मध्यात कोणाला बाद व्हावे लागेल याबाबत उत्सुकता आहे.

Bigg Boss Marathi 5 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) होस्ट करत असलेला बिग बॉस मराठी 5 (Bigg Boss Marathi 5) त्याचा बहुप्रतिक्षित ग्रँड फिनाले (Bigg Boss Marathi Finale Week) घेऊन येत आहे. नेहमी 100 दिवस चालणारा हा कार्यक्रम अचानक 70 दिवसांमध्ये गुंडाळला जातो आहे. त्याचे कारण गुलदस्त्यात असतानाच शेवटचा दिवस जवळ येऊन ठेपल्याने कार्यक्रमाच्या विजेतेपदाची ट्रॉफी उचलण्यासाठी घरातील स्पर्धकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. येत्या 6 ऑक्टोबर 2024 रोजी नियोजित ग्रँड फिनाले होऊ घातला आहे. ज्यामध्ये अंतिम विजेता जाहीर केला जाईल. हा हंगाम नाट्यमय, तीव्र प्रतिस्पर्ध्यांनी आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना पडद्यावर खिळल्याचा दावा होस्ट आणि वाहिनीने केला आहे.

पंढरीनाथ कांबळे थोडक्यात बाद

बिग बॉस 5 मधील स्पर्धक पंढरीनाथ कांबळे म्हणजेच 'पॅडी' यांनी नॉमिनेशनमध्ये सर्वात कमी मते मिळाल्याने घराचा निरोप घेतला. अंकिता प्रभू वालावकरकर आणि पॅडीमध्ये अंतिम सामना झाला. ज्यामध्ये अंकिता यांनी घरातील स्थान कायम ठेवले. त्यांच्या पूर्वी वर्षा उसगावकर यांनी जनमताचा कौल असणारा शेवटचा सामना निकराने लढला आणि आपले स्थान भक्कम केले. त्यामुळे आता घरात एकूण सात सदस्य उरले आहेत. त्यामुळे अंतिम पाचमध्ये कोणते स्पर्धक राहणार आणि त्यातही बिग बॉस ट्रॉफी कोण उचलणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5: वर्षा उसगावकर यांना पाहून अनिल थत्ते यांना तारुण्य आठवले; अभिजित बिचुकले, राखी सावंत प्रकटले, स्पर्धकांचे कान उपटले)

बिग बॉस मराठीचा 10 आठवडा नामांकन

निक्की तोंबोळी हिने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर, अंतिम नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. ज्यात सहा स्पर्धक बाद होण्याच्या मार्गावर आहेत. नामनिर्देशितांमध्ये जान्हवी किलेकर, सूरज चव्हाण, धनंजय पवार, वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत आणि अंकिता वालवलकर यांचा समावेश आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकांना बाद होण्यापासून वाचवण्याच्या आशेने चाहते मोठ्या संख्येने मतदान करत आहेत. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5 Finalist: बिग बॉस मराठी 5 च्या घरात Nikki Tamboli ने Ticket to Finale जिंकत मिळवला अंतिम फेरीत प्रवेश)

शेवटचे ते दोघे कोण? अंतिम सामन्यासाठी चुरस

प्रेक्षांच्या मतदानाच्या अलीकडील कलानुसार, सर्वात जास्त मतांसह सूरज चव्हाण शर्यतीत आघाडीवर आहे. त्यानंतर धनंजय पवार यांचा क्रमांक लागतो. मात्र, टिकून राहण्यासाठी पुरेशी मते मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या जान्हवी किलेकर आणि वर्षा उसगावकर यांना तळाच्या दोन जागा मिळाल्या आहेत. आठवड्याच्या मध्यात एलिमिनेशन जवळ येत असल्याने, या दोघांपैकी एकाला त्यांच्या बिग बॉसच्या प्रवासाला निरोप द्यावा लागू शकतो. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5: ‘घे पाऊल पुढे जरा’ गाण्यावर वर्षा उसगांवकर यांनी स्वप्निल जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यासोबत केला डान्स (Watch Video))

दरम्यान, निक्की तांबोळी हिने आगोदरच फिनाले तिकीट मिळवले असल्याने तिचे अंतिम स्पर्धकांतील स्थान नक्की झाले आहे. दरम्यान, तिच्यासोबत सामना करण्यासाठी कोण मैदानात असेल याबाबत उत्सुकता आहे. मतांचा कल पाहिला तर सूरज आघाडीवर आहे. मात्र, अभिजीत सावंत हा देखील छुपा रुस्तम म्हणून ओळखला जातो. अशा स्थितीत ट्रॉफीवर दावा कोण सांगणार याबाबत उत्सुकता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now