Bigg Boss Marathi 5: वर्षा उसगावकर यांना पाहून अनिल थत्ते यांना तारुण्य आठवले; अभिजित बिचुकले, राखी सावंत प्रकटले, स्पर्धकांचे कान उपटले

त्यात वर्षा उसगावकर यांना पाहून अनेकांनी कौतुक केले आणि त्यांच्याप्रति आपले प्रेमही व्यक्त केले.

Anil Thatte, Abhijeet Bichukale, Rakhi Sawant | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 5) हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी बिग बॉस अनेक नवनवे आश्चर्याचे धक्के देत आहे. या कार्यक्रमासाठी शनिवार, रविवार म्हटले की, सर्वांना उत्सुकता असते ती भाऊचा धक्का (Bhaucha Dhakka) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांची. पण या आठवड्यात रितेश हे चित्रिकरणासाठी व्यग्र असल्याने धक्क्यावर येऊ शकले नाहीत. हिच संधी साधत राखी सावंत (Rakhi Sawant), अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि अनिल थत्ते (Anil Thatte) यांना पाहुणे म्हणून घरात आणण्यात आले. या पाहुण्यांनी जाम धमाल आणत स्पर्धकांचे कान उपटले तर प्रेक्षकांचे मनरोंजन केले.

अभिजित बिचुकले संतापले

बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच बिचुकले यांनी कॅमेऱ्या खेचून घेतला. घराती स्पर्धकांच्या बऱ्या, वाईट गोष्टी सांगताना बिचुकले इतके संतापले की, त्यांना घरातील स्पर्धकांच्या संतापाचाही सामना करावा लागला. अर्थात एका मर्यातेच्या पलिकडे कोणताच स्पर्धक त्यांच्यावर फार संतापला नाही. पण, त्यांनी वर्षा उसगावकर, अभिजित सावंत, निक्की तांबोळी, सुरज चव्हाण यांचे तोंडभरुन कौतुक केले. पण, अभिजित बिचुकले यांचे कौतुक पॅडी कांबळ, धनंजय (डपी), अंकीता प्रभुवालावरकर यांच्या वाट्याला मात्र आले नाही. त्यांनी या तिघांवर कुचकेपणाचाच शिक्का मारला. बाकिच्यांना मात्र आपण चांगले खेळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी 30 सेकंदांचे व्हिडिओ करणाऱ्यांना इन्फ्लुएंसर (Influencers) म्हणने बंद करावे. ती फार मोठी गोष्ट आहे, असे म्हटल्यावर इन्फ्लुएंसर म्हणून घरात एन्ट्री मिळवलेल्यांना त्यांचे वाक्य चांगलेच झोंबले. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळीची एन्ट्री; लुडोवर डान्समध्ये सदस्यांनी केली धमाल-मस्ती (Watch Video))

मैं..हूँ.. मैं..हूँ.. डॉन

बेधडक, बिनधास्त राखी सावंत

बिग बॉसच्या घरात सिझन सुरु झाला तेव्हापासून निक्की तांबोळी हिचा अपवाद वगळता एक निरव शांतता नांदत होती. खरेतर ही शांतता या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी बरीच कंटाळवाणी. त्यामुळे कार्यक्रमात एक प्रकारचा साचलेपणा आला होता. पाहुणी म्हणून का होईना राखी सावंत घरात आल्या आणि त्यांनी सर्व कसर भरुन काढली. त्यांच्या प्रवेशानेच निक्कीसारखा स्पर्धक हादरुन गेला होता. तिने अभिजित सावंत याची घेतलेली फिरकी, उसगावकरांचे केलेले उत्स्फूर्त स्वागत आणि सूरजला दिलेले प्रेम बरेच काही सांगून जाणारे ठरले. त्यांनी निक्कीला मात्र जाता जाता चांगलेच टोले गावले. पॅडी आणि बाकिच्यांनाही मोलाचे सल्ले दिले. (हेही वाचा: Bigg Boss Marathi: आईकडून अरबाजबद्दल ऐकून निक्कीला आला राग; फेकून दिलं सर्व सामान)

ड्रामा क्विनचा हटके ड्रामा

वर्षा उसगावकर यांचे डोळे आणि अनिल थत्ते यांचा रोमान्स

मराठी बिग बॉसच्या पहिल्या आणि ऐतिहासिक कार्यक्रमातील एक स्पर्धक अनिल थत्ते हे देखील शनिवारी (28 सप्टेंबर) घरात आले होते. थत्ते हे महाराष्ट्राला नानाविध कारणांसाठी परिचित असलेले व्यक्तीमत्व. त्यांची वेशभूषा, केशभूषा आणि अभूषण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतेच. पण त्यांची शब्दांवर असलेली जरब बरेच काही सांगून जाते. बिगबॉसच्या घरातही काल त्यांनी ती दाखवून दिली. आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांनी स्पर्धकांशी संवाद साधला. खास करुन वयाच्या पंचाहत्तरीमध्येही त्यांची वर्षा उसगावकर यांच्या प्रति असलेली खास आत्मियता दिसली. आपल्या तरुण वयापासून त्यांच्या मनात असलेला रोमान्स त्यांनी काल घरात बाहेर काढला. 'आपले हात हातात यायला इतकी वर्षे वाट पाहावी लागली' हे वाक्य बरेच काही सांगून गेले. एकूणच काय तर त्यांचे बिग बॉसच्या घरात येणे उत्साह आणि प्रेरणादायी राहिले.

थत्तेंच्या नजरेतून स्पर्धकांचे विश्लेषण

दरम्यान, मराठी बिगबॉसच्या इतिहासात प्रथमच हा कार्यक्रम अवघ्या 70 दिवसांमध्ये गुंडाळला जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाला किंवा नाही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना वाटते तो हिट झाला. तर काहींना वाटते नेहमीच्या तुलनेत हवी तशी प्रसिद्धी आणि चर्चेत राहायला हा कार्यक्रम कमी पडला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif