Bigg Boss Marathi 2, Episode 89 Preview: घरातील सदस्य ठरवणार स्वत:च मूल्यांकन, शिवानी सुर्वे हिने ठरवली तिची 2 लाख रुपये किंमत
तर बुधवारच्या एपिसोडमध्ये शिवानी आणि नेहा या दोघींना बिग बॉसच्या फायनचे तिकिट देण्यात आले असल्याचे घोषित करण्यात आले.
बिग बॉस 2 चे पर्व संपण्यासाठी आता फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. तर बुधवारच्या एपिसोडमध्ये शिवानी आणि नेहा या दोघींना बिग बॉसच्या फायनचे तिकिट देण्यात आले असल्याचे घोषित करण्यात आले. तर आजच्या भागात घरातील सर्व सदस्यांना त्यांचे स्वत: चे किती मूल्यांकन आहे हे बिग बॉसने दिलेल्या मुद्रांमधून ठरवायचे आहे. यामध्ये किशोरी, वीणा आणि शिव यांनी त्यांचे मूल्यांकनासाठी 6 लाख रुपये ठरवले आहेत.
मात्र फायनलमध्ये पोहचलेली सदस्य शिवानी सुर्वे हिने तिचे मूल्यांकन करण्यासाठी 2 लाख रुपये ठरवले आहे. ही रक्कम ठरवताना शिवानी हिने यापूर्वी तिच्याकडून ज्या चुका झाल्या त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. मात्र बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा एन्ट्री केल्यानंतर मी माझा राग आणि अन्य गोष्टी नीट केल्याचे मत शिवानी हिने मांडले आहे.(Bigg Boss Marathi 2: 'शिवानी सुर्वे' फिनाले मध्ये पोहचल्याने बिग बॉसचे चाहते संतापले; सोशल मिडीयावर उमटल्या अशा प्रतिक्रिया)
Colors Marathi ट्वीट:
त्याचसोबत बिचुकले यांनी केलेल्या विधानांमुळे नेहा हिने त्यांच्यावर राग व्यक्त केला. तसेच बुधवारी सुद्धा बिचुकले यांनी केलेल्या काही विधानांमुळे शिवानी हिने त्यांच्यावर संताप व्यक्त केला होता. बिचुकले हे जरी बिग बॉसच्या घरात पाहुणे असले तरीही त्यांच्या बोलण्या-वागण्यामुळे काही वेळेस घरातील सदस्यांना त्यांचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.