Bigg Boss Marathi 2, Episode 75 Preview: अनोळखी लोकांकडून घरात होणार घुसखोरी; संजय नार्वेकर सदस्यांना देणार भन्नाट टास्क

लोक घुसखोरी करणार आहेत. तिजोरीची चावी कोणाकडे आहे? असे म्हणत हे लोक दादागिरी करू लागतात. ही चावी कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही त्यामुळे हे लोक घरातील सामानाची तोडफोड करू लागतात. आता हे घुसखोर नक्की कोण आहेत ते एपिसोड पाहिल्यावरच समजेल.

Bigg Boss Marathi 2, Episode 75 Preview: अनोळखी लोकांकडून घरात होणार घुसखोरी; संजय नार्वेकर सदस्यांना देणार भन्नाट टास्क
Bigg Boss Marathi 2, Episode 75 Preview (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 2) घरात या आठवड्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर घरात ये रे ये रे पैसे 2 चित्रपटामधील कलाकारांच्या आगमनानंतर नवचैतन्य निर्माण झाले आहे. आजच्या भागात काही लोक घुसखोरी करणार आहेत. तिजोरीची चावी कोणाकडे आहे? असे म्हणत हे लोक दादागिरी करू लागतात. ही चावी कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही त्यामुळे हे लोक घरातील सामानाची तोडफोड करू लागतात. आता हे घुसखोर नक्की कोण आहेत ते एपिसोड पाहिल्यावरच समजेल.

पुढे घरातील सदस्यांना एक टास्क दिला जाणार आहे. बिचुकले हे किशोरी यांची मुलगी असणार आहेत. किशोरीला बिचुकले यांच्या दोन वेण्या घालून त्यांना शाळेल पाठवायचे आहे. शेवटी किशोरी बिचुकले यांचा मधून भंग पडून सुरेख अशा दोन वेण्या घालतात. संपूर्ण नटून झाल्यावर बिचुकले नक्की कसे दिसतील यासाठी आजचा भाग पाहणे गरजेचे आहे. (आजच्या भागात काय घडेल हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

पुढे नेहा व अभिजित यांना एकमेकांच्या भूमिका देऊन एकमेकांशी भांडायला सांगितले जाते. म्हणजे अभिजित नेहा असेल आणि नेहा अभिजित असेल अशा अवस्थेत हे दोघे एकमेकांशी कसे भांडतील ते पाहण्यास मजा येणार आहे. तर अशाप्रकारे एकमेकांचे चेहरे बघून बघून कंटाळलेल घरातील सदस्यांना थोड चेंज मिळणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2019 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).