Bigg Boss Marathi 2, Episode 55 Preview: बिग बॉसच्या घरात अडगळीच्या खोलीत असलेला अभिजित केळकर सुटणार की अडकणार? पहा काय असेल रूपाली चा निर्णय

खुनी सदस्यांचा खून पाडण्यासाठी करत असलेली चालाखी आणि त्यामधून होणारे समज-गैरसमज यामुळे घरात मोठे वाद रंगणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Voot)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi)  च्या घरात मर्डर मिस्ट्रीचा खेळ जसा रंगात आला आहे तसा तो अधिक चुरशीचा होत चालला आहे. खुनी सदस्यांचा खून पाडण्यासाठी करत असलेली चालाखी आणि त्यामधून होणारे समज-गैरसमज यामुळे घरात मोठे वाद रंगणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. घरात आज पुन्हा जेवणावरून वाद रंगले आहेत. हीना, रूपाली आणि नेहा यांच्यामध्ये वाद रंगणार आहेत. हा टास्कचा एक भाग आहे की घरात पुन्हा सदस्य होस्ट महेश मांजरेकर यांच्या ताकीदीला न जुमानता पुन्हा जेवणावरून वाद घालणार आहेत? आजच्या भागात पुन्हा मर्डर मिस्ट्री हे टास्क नव्या वळणावर येणार आहे. पहा बिग बॉस मराठी 2 च्या घरात आज काय होणार?

अभिजीत केळकर हा मर्डर मिस्ट्री या कार्यात घरात एका सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आला होता. मात्र आज बिग बॉस प्रोमोमध्ये तो अडगळीच्या खोलीत दिसला आहे. अडगळीच्या खोलीतून त्याला बाहेर काढण्यासाठी तो गयावया करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अभिजीतची अवस्था पाहून शिव आणि वैशाली त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण घराची कॅप्टन रूपाली भोसले असल्याने तिच्याशिवाय अडगळीच्या खोलीचे दार इतर कुणी उघडू शकत नाही. पण हा टास्कचा एक भाग असल्याने रूपाली कसा निर्णय घेणार? हा खरंच खेळाचा भाग आहे का? हे पहाणं आता उत्सुकतेचं आहे. पहा आज पर्यंतच्या भागात काय झालं? 

 Bigg Boss Marathi 2 एपिसोड प्रिव्ह्यू 

सध्या घरात शिव ठाकरे, किशोरी शहाणे आणि वैशालीचा खून झाला. खूनी म्हणून शिवने वीणाचा खून करायला नकार दिल्याने त्याच्याकडून खूनी असल्याचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे तर त्याच्या जागी नेहाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आज कोणाकोणाचा खून होतोय? आणि या खेळात पुढील आठवड्यासाठी कॅप्टन्सीपदाच्या शर्यतीमध्ये कोण पुढे जाणार याचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.