Bigg Boss Marathi 2, Episode 44 Preview: शिव आणि हीना यांच्यामध्ये होतायात वाद, तर बिग बॉसने सदस्यांना शिक्षा देत काढून घेतलं Luxury Budget
तर 'एकच फाईट वातावरण टाईड' या टास्कदरम्यान सदस्यांचा रोष नेहावर दिसल्याने तिच्या डोळ्यात अश्रू दिसले.
बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातून स्पर्धक सुरेखा पुणेकर या बाहेर पडल्या आहेत. तर 'एकच फाईट वातावरण टाईड' या टास्कदरम्यान सदस्यांचा रोष नेहावर दिसल्याने तिच्या डोळ्यात अश्रू दिसले. तर नेहमी प्रमाणेच आता सुद्धा शिव आणि हीना यांच्यात वारंवार वाद होऊन खटके उडताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला वीणा आणि रुपाली यांच्या वागण्यामुळे किशोरी दुखावल्या गेल्याने एकट्या पडल्याचे त्या बोलत आहेत.
तर आता बिग बॉसच्या घरात एकूण नऊ सदस्य टॉप ठरले असले तरीही बिग बॉसला त्याची लाज वाटत असल्याचे म्हणतात. त्यानंतर घरात काळ्या रंगातील कपड्यांमधील व्यक्ती येतात आणि घरातील सर्व लक्झरी बजेटमधील पदार्थ जप्त करताना दिसून येतात. यावर सर्व स्पर्धक बिग बॉसची माफी मागताना दिसून येतात. (Episode 44 Preview पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याचसोबत या आठवड्यात माधव हा घराचे कॅप्टनपद सांभाळत आहे. मात्र काळ्या रंगातील एक व्यक्ती त्याच्याकडे येत तु कॅप्टन आहेस ना उठ अशा संतप्त शब्दात त्याला बोलतो. परंतु नेमके असे काय घडले आहे की सदस्यांना कोणत्या कृत्याची शिक्षा देत आहे हे आजच्या एपिसोडमध्ये पाहणे महत्वाचे ठरणार आहे.