Bigg Boss Marathi 2, Episode 25 Preview: धोबीपछाड कार्य पार पडताना बिग बॉसच्या घरात रंगला आरोप प्रत्यारोपाचा खेळ (Watch Video)
या कार्य पार पाडताना देखील सदस्यांमध्ये वादावादी होताना दिसत आहे.
बिग बॉस मराठी 2 मध्ये आज घरातील सदस्यांवर धोबीपछाड कार्य सोपवले आहे. हे कार्य पार पाडताना देखील सदस्यांमध्ये वादावादी होताना दिसत आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात थेट संचालिकेवर आरोप करण्यात येत आहेत. काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्येही घरात चांगलाच वाद रंगला. त्यानंतर आज नवा वाद समोर येत आहे.
आजच्या धोबीपछाड टास्क पार पाडत असताना नेहा शितोळे आणि कॅप्टन वैशाली माडे यांच्यात वाद रंगला. ('शेरास सव्वा शेर' टास्कमध्ये जोरदार वादावादी; वीणा जगताप, पराग कान्हेरे, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर आणि अभिजीत बिचुकले झाले नॉमिनेट)
पहा व्हिडिओ:
काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये जोरदार वादावादीनंतर वीणा जगताप, पराग कान्हेरे, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर आणि अभिजीत बिचुकले नॉमिनेट झाले. तर शिव याला यापूर्वीच सर्वानुमते नॉमिनेट करण्यात आले होते.