Bigg Boss Marathi 2 चा स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना पोस्टमन मारहाण प्रकरणी जामीन मंजूर, तर खंडणी प्रकरणासंदर्भात उद्या होणार कोर्टात सुनावणी

याप्रकरणी त्याचा जामीन मंजूर करण्यात आला आ

Abhijeet Bichukale | (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) चा स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) याला पोस्टमनला मारहाण केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. चेक बाउन्स झाल्याकारणाने त्याची बिग बॉस मराठी 2 च्या घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. पोलिसांनी बिचुकले ला थेट बिग बॉस मराठी 2 च्या घरातूनच अटक केली होती. त्यानंतर त्यांनी नवनवीन प्रकरण समोर येत होती. चेक बाऊन्स प्रकरण, पोस्टमन मारहाण प्रकरण, खंडणी प्रकरण या सर्व प्रकरणांमध्ये त्यांच्यावर केस अटक, जामीन हे नाट्य सुरुच होते. त्यातच आता त्यांना पोस्टमनला मारहाण केल्याप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला असून, उद्या खंडणी प्रकरणासंबंधी कोर्टात सुनावणी होणार आहे.

कोर्टाच्या या निर्णयाने बिचुकलेंना दिलासा मिळाला आहे खरा पण खंडणी प्रकरणासंबंधी उद्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने उद्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहेत. तसेच त्यांची शिवाना सारखी पुन्हा बिग बॉस मराठी 2 च्या घरात प्रवेश होणार का हेही अजून निश्चित नाही.

हेही वाचा- न्यायालयाने अभिजित बिचुकले यांचा जमीन फेटाळला; बिग बॉसमध्ये सामील होण्याच्या अडचणीत वाढ

अभिजित बिचुकले हे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून काही ना काही कारणाने चर्चेत राहिले आहेत. प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र अचानक 21 जून रोजी बिचुकले यांना सेटवरून अटक झाली. चेक बाउन्स आणि खंडणी प्रकरणी बिचुकले यांच्यावर सातारा पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना तुरुंगातही ठेवण्यात आले होते. मात्र तक्रारदाराने तक्रार मागे घेऊनही आता न्यायालयाने त्यांचा जमीन फेटाळला आहे.