Bigg Boss Marathi 2, 7 July, Episode 43 Updates: बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकर बाहेर, तर नेहावर सदस्यांचा रोष व्यक्त झाल्याने डोळ्यांत दिसले अश्रू

या टास्कदरम्यान घरातील सदस्यांना कोणत्या अन्य सदस्याबद्दल राग येतो ते व्यक्त करायचा आहे. त्यासाठी एक बॉक्सिंग बिनवर ज्या व्यक्तीचा राग येतो त्याच्या फोटोवर घरातील सदस्यांना फाईट मारत त्याचे कारण स्पष्ट करायचे आहे.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

कालच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये नेहाच्या टीममध्ये फूट पडल्याचे दिसून आले. तर नेहाच्या टीममधील सदस्य अभिजित आणि वैशाली हे दोघेजण तिच्यापासून दूर झालेले आहेत. त्याचसोबत अभिजितने तिने बिबी हॉटेलदरम्यानच्या वागणुकीमुळे संतापला असून तिच्यावर त्याने टीका करत त्याचे मत व्यक्त केले आहे. तर दुसऱ्या बाजूला किशोरी शहाणे आणि सुरेखा यांच्यामध्ये वयावरुन खटके उडाले. त्यामुळे महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या घरात यापुढे वयावरुन कोणीही एकमेकांना बोलू नये याची सक्त ताकीद दिली आहे.

आजच्या भागात घरातील सदस्यांची पुन्हा एकदा उजळणी घेण्यासाठी महेश मांजरेकर येतात. प्रथम घरातील वातावरण आनंदाचे दिसून येते. मात्र काही वेळानंतर महेश मांजरेकर घरातील सदस्यांना ‘एकच फाईट आणि वातावरण टाईट’ हा टास्क देतात. या टास्कदरम्यान घरातील सदस्यांना कोणत्या अन्य सदस्याबद्दल राग येतो ते व्यक्त करायचा आहे. त्यासाठी एक बॉक्सिंग बिनवर ज्या व्यक्तीचा राग येतो त्याच्या फोटोवर घरातील सदस्यांना फाईट मारत त्याचे कारण स्पष्ट करायचे आहे.

वैशाली किशोरी यांच्याबद्दल आपला संताप व्यक्त करत टास्कमध्ये काही गोष्टी चुकीची झाली तर तेच आठवडाभर घेऊन बसतात. त्याचसोबत नेहा हिचा फोटोवर सुद्धा फाईट मारत तुझा पराग कान्हेरे होताना दिसून येत असल्याचे म्हणते. तसेच टास्कदरम्यान तु ओव्हरकॉन्फिड वागते असे सुद्धा म्हणते. टीमच्या अन्य सदस्यांसोबतवागण्यासाठी  स्वभावात थोडा बदल आणून आमच्यासोबत नीट वाग असे म्हणते.

अभिजित किशोरी आणि नेहा यांचा फोटो निवडतो. सुरुवातील तो किशोरीला सॉरी बोलतो. मात्र गेल्या सव्वा महिन्यांपासून दोघांमध्ये काही बोलणे झाले नाही याबद्दल बोलतो. तर पराग कान्हेरेच्या नावावरुन तो किशोरी यांना सुनावत त्यांचे तुम्ही ऐकून आमच्या सारख्या माणसांसोबत वाकडे घेतात असे  म्हणतो. नेहाच्या फोटोला हाताने न मारता डोक्याने मारत टीका करतो. तसेच कायम स्वत:ची सोय बघायची असे म्हणत हवे तसे वागायचे असा शब्दांतून राग व्यक्त करतो. तसेच शिवानीसुद्धा तुझ्यामुळेच बाहेर गेल्याचे म्हणतो. अभिजितचा नेहावरचा राग फारच उफाळून येताना दिसला.(नेहाच्या डोळ्यात अश्रू दिसतात) या टास्कवेळी घरातील बहुतांश सदस्यांचा रोष नेहावर निघतो. यामुळे नेहा दुखावलेली दिसून येते.

नेहा प्रथम अभिजित आणि स्वत:चा फोटो लावते. अभिजितवर राग व्यक्त करत जे काही वाईट वाटले त्याबद्दल थेट येऊन बोलायचे होते असे म्हणते. तसेच मुलगी असल्याचे भांडवल केल्यावरुन सुद्धा त्याला सुनावत प्रामाणिकपणा दिसून येऊन देत. फक्त दाखवण्यासाठी गोष्टी करणे बंद कर असे म्हणते. स्वतच्या फोटोवर फाईट मारत प्रत्येकवेळी दुसऱ्यांना सॉरी किंवा आपण मान द्यायला जायचे नाही असे म्हणते. सगळ्यांचे दुख आपण घेतो असे म्हणत येथे  दिसते तसे नसते सुद्धा म्हणते. तर आतापासून बिग बॉसच्या घरात नीट वागायचे असे म्हणते.

शेवटच्या भागात महेश मांजरेकर शिवानी घरात हवी होती अशा भावना व्यक्त करतात. त्यानंतर नेहाचा अश्रूंचा बांध फूटतो आणि अभिजितने नेहावर शिवानी तिच्यामुळे बाहेर गेल्याचा आरोप लावतो त्याचे ती स्पष्टीकर महेश मांजरेकर यांच्यासमोर व्यक्त करते.  तर शिवानीच्या आरोपावराचे मी कधीच स्पष्टीकरण कोणालाच आयुष्यात देणार नाही असे म्हणते. त्याचसोबत अभिजित पुन्हा एकदा नेहावर टीका करत तिचे आरोप खोडून लावतो.आज बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकर यांचा प्रवास संपला असून त्या बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे आता घरात फक्त नऊ जण राहिले आहेत.