Bigg Boss Marathi 2, 25th June, Day 30 Updates: नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांनी मांडला एकमेकांच्या पाप पुण्याचा हिशोब, पहा कोण झाले असुरक्षित

(इथे हीनाने तिची खेळी व्यवस्थित खेळली आहे, तिला जे हवे आहे ते सध्या झालय). मात्र शिवची आता द्विधामनःस्थिती झाली आहे.

Bigg Boss Marathi 2, 25th June (Photo Credit : Colors)

Bigg Boss Marathi 2, Episode 31 Highlights: कालच्या भागात शिव आणि किशोरी यांच्यामध्ये कप्तानपदासाठी मनोऱ्याचा टास्क खेळला गेला. यामध्ये शिव विजयी ठरल्याने तो या घराचा नवीन कप्तान झाला आहे. सकाळी अखेर वीणा आणि रुपाली किशोरीला ती बदलली असल्याचे सांगतात. मात्र किशोरी मी जे काही करत आहे ती माझी स्ट्रॅटेजी असल्याचे सांगते. दुसरीकडे वीणा आणि शिवमध्ये फारकत झाल्याचे दिसून येते. (इथे हीनाने तिची खेळी व्यवस्थित खेळली आहे, तिला जे हवे आहे ते सध्या झालय). मात्र शिवची आता द्विधामनःस्थिती झाली आहे. इतके सगळे झाल्यानंतर आता एकदा आता वीणा, किशोरी, रुपाली आणि पराग यांचा ग्रुप परत एकत्र आल्याचे दिसते.

दरम्यान, बिग बॉसकडून ‘हिशोब पाप पुण्याचा’ हा नॉमिनेशन टास्क दिला जातो. पहिल्यांदा पराग आणि अभिजित एकमेकांच्या पाप पुण्याचा हिशोब मांडतात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यावर, पराग नरकात जातो तर अभिजित स्वर्गात जातो. त्यानंतर किशोरी आणि सुरेखा यांच्यापैकी किशोरी नरकात तर सुरेखा स्वर्गात जातात. त्यानंतर वीणा आणि हीना एकमेकींच्या भरपूर चुका सांगतात, अखेर शिव आणि सल्लागार यांच्या विचाराने हीना स्वर्गात जाते तर वीणा नरकात जाते. शेवटी वैशाली आणि रुपाली एकमेकींवर अतिशय कुरघोडी करतात, इथे शिव वैशालीला स्वर्गात पाठवतो तर रुपालीला नरकात पाठवतो.

त्यानंतर माधव याच्यासोबत पाप पुण्याचा हिशोब  मांडण्यासाठी, जे लोक स्वर्गामध्ये गेले आहे त्यांच्यापैकी शिव हीनाला असुरक्षित करून माधवसोबत हिशोब मांडायला उभे करतो. त्यानंतर हीना नरकात जाते तर माधव स्वर्गात जातो. अशाप्रकारे वीणा, पराग, रुपाली आणि किशोरी या चौघांनाही शिवने असुरक्षित केल्याने हा ग्रुप प्रचंड चिडतो. शिव स्वतःच्या बुद्धीने खेळला नाही असा आरोप त्याच्यावर केला जातो.

इथे अचानक वीणा आणि सुरेखा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरु होते. आज पहिल्यांदा सुरेखा वीणाच्या बोलण्याला कुत्र्याचे भुंकणे असा उल्लेख करत तिचा अपमान करतात. अशाप्रकारे या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी वीणा, पराग, रुपाली, हीना आणि किशोरी हे लोक या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.

(या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार नसल्याने वोटिंग लाईन्स बंद असणार आहेत)