Bigg Boss Marathi 2, 23 June #WeekEndChaDaav Preview: महेश सरांसमोर वीणा जगताप चं ओपन चॅलेंज; पहा काय म्हणाली (Watch Video)
WeekEnd च्या डावात महेश सरांसमोरील वीणा जगताप हिच्या ओपन चँलेजने सर्व स्पर्धक अचंबित.
यंदाच्या WeekEnd च्या डावात कालच्या भागात महेश मांजरेकरांनी बिग बॉसच्या घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. पुरुषांसह महिलांना देखील त्यांच्या चुका उघडपणे सांगण्यात आल्या तर स्पर्धकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुकही करण्यात आले. नॉमिनेट झालेल्या पाचजणांपैकी बिचुकले अटकेमुळे बाहेर पडले. राहिलेल्या चारजणांपैकी वीणा सुरक्षित असल्याचे महेश सरांनी जाहीर केले. तर पराग डेंजर झोनमध्ये गेल्याचे कळले. आता राहिलेल्या दोघांपैकी म्हणजेच सुरेखाताई पुणेकर, शिव आणि बाप्पा म्हणजेच विद्याधर जोशी यांच्यात आता कोण सुरक्षित आहे, हे आजच्या भागात कळेलच. (अभिजित बिचुकले यांना न्यायालयीन कोठडी; Bigg Boss मधील 'घरवापसी' बद्दल साशंकता कायम)
पण त्यापूर्वी यंदाच्या WeekEnd च्या रंगलेल्या डावात महेश सर विचारतात की, 'हातचं सोडून पळत्याच्या पाठी धावणे’ ही म्हण तंतोतंत कोणाला लागू होते? यावर वीणा परागचं नाव घेते. त्यावर परागचे काही उत्तर येण्यापूर्वीच वीणा महेश सरांना ओपन चॅलेंज देते की, यांच्यासोबत मी कधी अप्रामाणिकपणे वागले सांगा. मी आता बॅग भरुन घरातून बाहेर निघून जाईन." यावर सर्व स्पर्धकांचा चेहरा पाहण्यासारखा होतो.
पहा व्हिडिओ:
या प्रिव्ह्यूने तर आजच्या एपिसोडची उत्सुकता वाढवली आहे. आजच्या भागात बिग बॉसच्या घराबाहेर कोण पडणार? या सोबतच वीणाच्या या ओपन चँलेजला इतर स्पर्धकांची काय प्रतिक्रीया असणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे.