Bigg Boss Marathi 2, 14 July, Episode 50 Updates: माधव आणि नेहामुळे हीनाच्या अश्रूंचा फुटला बांध; बिग बॉसच्या घरात पुन्हा रंगला Elimination Drama
ते ती का बोलली असा प्रश्न शिवानी विचारते. यावर वीणाच्या उडवा उडविच्या उत्तराने दोघींमध्ये भांडण सुरु होते. त्यानंतर घरात एक गेम सुरु होतो.
बिग बॉसच्या वीकएंडच्या डावामध्ये महेश मांजरेकर यांच्या एन्ट्रीने वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्याचा आढावा घेण्याचे काम चालू आहे. आज त्यात भर पडली ती शिवानी हिच्या प्रश्नाने. ‘पराग तू तिला नादाला लाव, ती तशीच आहे’ असे वाक्य वीणा बोलली होती. ते ती का बोलली असा प्रश्न शिवानी विचारते. यावर वीणाच्या उडवा उडविच्या उत्तराने दोघींमध्ये भांडण सुरु होते.
त्यानंतर घरात एक गेम सुरु होतो. एका संदुकमध्ये काही गोष्टी आहेत, त्या वस्तूनुसार घरात तसे कोण आहे हे ठरवण्यात येते. ट्युबलाईट ठरते हीना, सर्वांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून वीणाला खंजीर देण्यात येतो. रिमोट कंट्रोल नेहाला देण्यात येतो. खेळणे शिवला देण्यात येते. चमचा शिवला देण्यात येतो. भोपू वीणाला देण्यात येतो. माचीस वैशालीला देण्यात येते. त्यानंतर रूपालीला ज्या प्रकारे वैशाली फोनवर बोलली त्याबद्दल तिला दोषी ठरवण्यात येते.
त्यानंतर प्रश्न उत्तरांचा पुढील गेम सुरु होतो. विचारलेल्या प्रश्नांची घरातील सदस्य आणि शिवानी दोघेही उत्तरे देतील. दोघांची उत्तरे बरोबर आली तर तो सदस्य वाचेल मात्र जर उत्तर चुकले तर त्या सदस्याला कानाखाली बसणार. अशाप्रकारे वीणाला 1, वैशालीला 1, माधवला 4 आणि अभिजितला 2 कानाखाली बसतात. (हेही वाचा: भाकरी प्रकरणामुळे चढला महेश मांजरेकरांच्या रागाचा पारा; वीणाने लावलेल्या आगीत जळाले सर्व सदस्य
त्यानंतर शिवानी घरात आल्याबद्दल प्रत्येकाला काय वाटते ते विचारण्यात येते. त्यावर सर्वजण ती आल्याबद्दल आनंद व्यक्त करतात. नंतर लक्झरी बजेट कोणामुळे गेले याबाबत विचारणा होते. सर्वजण आपली चूक मान्य करतात. पुढे हीना थोडी इमोशनल होते. माधव आणि नेहा आपल्याला मुद्दाम एकटे पडत आहेत असे म्हणून ती ओक्साबोक्सी रडू लागते. त्यानंतर चुगली बूथ सुरु होते.
रुपाली आणि वीणा यांच्या चुगली त्यांना ऐकवल्यावर एलिमिनेशन ड्रामाला सुरुवात होते. या आठवड्यात कोणीच बाहेर जाणार नाही हे आधीच बिग बॉसनी सांगितले आहे. त्यानुसार माधव आणि रुपाली यांची उत्सुकता ताणून घरातून कोणीच बाहेर जाणार नसल्याचे सांगितले जाते.