Vaishali Takkar Found Hanging: अभिनेत्री वैशाली ठक्कर हिचा संशयास्पद मृत्यू, इंदौर येथील राहत्या घरात आढळला पंख्याला लटकता मृतदेह
वैशाली ठक्कर हिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या प्रसिद्ध अशा 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेत काम केले होते. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) आणि 'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) या दोन मालिकांमधून तीला चांगलीच ओळख मिळाली होती.
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Takkar) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ती अवघ्या 26 वर्षांची होती. मध्य प्रदेशातील इंदौर येथील राहत्या घरी छताला टांगलेल्या पंख्यासोबत तिचा मृतदेह लटकताना आढळून आला. ही घटना रविवारी (16 ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. वैशाली ठक्कर हिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या प्रसिद्ध अशा 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेत काम केले होते. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) आणि 'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) या दोन मालिकांमधून तीला चांगलीच ओळख मिळाली होती.
वैशाली ठक्कर हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची पोलिसांनीही पुष्टी केली आहे. तिच्या घरी एक चिठ्ठी सापडल्याचेही वृत्त आहे. सांगितले जात आहे की, तरुण अभिनेत्री वैशाली ठक्कर ही तिच्या वडील आणि भावासोबत इंदौरमध्ये राहिली होती. ती इतके कठोर पाऊल उचलेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती, असे तिच्या वडील आणि भावाने प्रसारमाध्यमांसी बोलताना म्हटले आहे.
वैशाली टक्करने 2015 मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ती नुकतीच 'रक्षाबंधन'मध्ये दिसली होती ज्यात तिने बिग बॉस फेम निशांत मलकानीसोबत काम केले होते. (हेही वाचा, Tamil Actress Deepa aka Pauline Jessica: तामिळी अभिनेत्री दीपा उर्फ पॉलीन जेसिका हिचा संशयास्पद मृत्यू, पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला)
ट्विट
वैशाली ठक्कर हिचे कुटुंब मूळचे उज्जैनमधील महिदपूरचे असून चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले. टीव्ही मालिकांमधील अभिनयासोबतच ती रिअॅलिटी शो 'बिग बॉस' मध्येही झळकली होती. नंतर ती जयपूरला गेली आणि अखेरीस इंदूरच्या तेजाजी नगर पोलीस स्टेशनच्या साईबाग कॉलनीत राहायला गेली. या ठिकाणी ती गेल्या वर्षभरापासून होती.
वैशालीच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि लहान भाऊ देखील कोणत्या ना कोणत्या व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. आज सकाळी वैशाली टाककर खोलीतून बाहेर न आल्याने तिचे वडील तिच्या खोलीत गेले असता तिचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)