Bigg Boss 14: सप्टेंबरपासून सुरु होणार सलमान खानच्या ‘बिग बॉस’चा 14 वा सिझन; निया शर्मा, व्हिव्हियन डीसेना, अध्यायन सुमन होऊ शकतात यंदाच्या पर्वाचा हिस्सा

हिंदी टेलीव्हिजनवर हा शो इतका लोकप्रिय ठरला आहे की, या शोने आतापर्यंत तब्बल 13 सिझन्स पूर्ण केले आहेत व लवकरच या शोचा 14 वा सिझन येऊ घातला आहे.

Bigg Boss 14 Premiere In September? (Photo Credits: Twitter, Instagram)

छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस (Bigg Boss) कडे पहिले जाते. हिंदी टेलीव्हिजनवर हा शो इतका लोकप्रिय ठरला आहे की, या शोने आतापर्यंत तब्बल 13 सिझन्स पूर्ण केले आहेत व लवकरच या शोचा 14 वा सिझन येऊ घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबरमध्ये बिग बॉसचे 14 वे पर्व सुरु होऊ शकते. अशा प्रकारे सलमान खान (Salman Khan) नवा लूक आणि नव्या फॉरमॅटसह लवकरच परतण्यास तयार आहे. त्याचबरोबर या शोसाठी काही स्पर्धकांची नावेही समोर येत आहेत.

अहवालानुसार, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री निया शर्मा  (Nia Sharma), व्हिव्हियन डीसेना (Vivian Dsena) आणि शेखर सुमन  (Adhyayan Suman) यांचा मुलगा अध्यायन सुमन यंदाच्या पर्वामध्ये दिसू शकतात. ईटाइम्सच्या अहवालानुसार सुष्मिता सेनचा भाऊ अभिनेता राजीव सेन याच्याशी देखील या हंगामासाठी संपर्क साधण्यात आला आहे. राजीव आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. याशिवाय शुभांगी अत्रे, सुरभी जोशी असे कलाकारही यंदाच्या सिझनचा हिस्सा होऊ शकतात. (हेही वाचा: सलमान खान ने शेअर केला शेतात काम करतानाचा फोटो म्हणाला, 'दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम')

पिंकविलाच्या अहवालानुसार बिग बॉस 14 मध्ये लॉकडाऊनबरोबरच सामाजिक अंतराचा परिणामही दिसून येईल. यंदाचा शो नवीन फॉर्मेटने सुरू करण्याची तयारी निर्मात्यांनी केली आहे. या हंगामात ‘लॉकडाउन’ हे एक मोठे आकर्षण असेल. काही रिपोर्टनुसार यंदा सदस्यांना घरामध्ये फोन घेऊन जाण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र यावर अजून निर्मात्यांची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस 12’ हा शो टीआरपीच्या बाबतीत अतिशय मागे पडला होता. या पर्वाला चाहत्यांनी तितके प्रेम दिले नाही. त्यानंतर पुढच्या सिझनमध्ये निर्मात्यांनी अनेक बदल केले होते. बिग बॉस 13 मध्ये रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा, शहनाज गिल आणि माहिरा शर्मा यासारखे मोठे कलाकार होते. असिम रियाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांचा भांडणांमुळे बिग बॉस 13 अतिशय गाजला होता. विजेता म्हणून सिद्धार्थ शुक्लाने या शोमधून बरीच प्रसिद्धी मिळविली.