Bigg Boss 14: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा बिग बॉस च्या घरात कोणताही Physical Task नाही; दर आठवड्याला होणार कोरोना टेस्ट

कोरोना व्हायरस संकट काळात सुरु होणाऱ्या या सीजनकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉसच्या घरात इतके स्पर्धक एका घरात राहणार म्हटल्यावर सुरक्षा चोख राखणे गरजेचे आहे.

Salman Khan (Photo Credits: Voot)

कलर्स टीव्हीवर (Colors TV) 3 ऑक्टोबर पासून बिग बॉस (Bigg Boss) च्या नव्या सीजनची सुरुवात होत आहे. कोरोना व्हायरस संकट काळात (Coronavirus Pandemic) सुरु होणाऱ्या या सीजनकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉसच्या घरात इतके स्पर्धक एका घरात राहणार म्हटल्यावर सुरक्षा चोख राखणे गरजेचे आहे. तसंच घरात सोशल डिस्टसिंगचे पालन केले जाईल असे यापूर्वी सांगण्यात आले होते. आता घरात कोणताही फिजिकल टास्क (Physical Task) नसेल आणि दर आठवड्यात स्पर्धकांची कोरोना चाचणी (Corona Test) केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मनोरंजनसाठी नेमके कशापद्धतीचे टास्क असणार याबाबत प्रेक्षकांनामध्ये उत्सुकता आहे.

बिग बॉस खबरीने याची माहिती इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. बिग बॉसमध्ये यंदा खूप काही बदलले दिसेल. यंदा घरात डबल बेड नसेल. तसंच बेड, प्लेट, ग्लास शेअरींगला परवानगी नसेल. विशेष म्हणजे यंदा कोणताही फिजिकल टास्क नसेल आणि दर आठवड्याला स्पर्धकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात येईल. त्याचबरोबर यंदा बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसाठी मिनी थिएटर, मॉल आणि रेस्टोरन्टची सुविधा देण्यात येईल.

पहा पोस्ट:

Bigg Boss Khabri Post

कोविड-19 लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या लोकांना बिग बॉस 14 द्वारे मनोरंजनाचे दार खुले होईल. अद्याप बिग बॉसमधील स्पर्धकांची नावे जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे त्याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. दरम्यान, बिग बॉसला रोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला युट्युबर कॅरी मिनाटी शो मध्ये दाखल होणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र खुद्द कॅरी मिनाटी याने या निव्वळ अफवा असल्याचे ट्विटद्वारे स्पष्ट केले. (CarryMinati on Bigg Boss 14 Funny Memes and Jokes: कॅरी मिनाटी सलमान खान च्या बिग बॉस शो मध्ये सहभागी होण्याची माहिती मिळताच चाहत्यांकडून सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!)

यंदाचा सीजन अधिक लोकप्रिय करण्यासाठी शो मध्ये मोठी नावे सहभागी करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे, असे बोलले जात होते. त्यामुळे या धमाकेदार शो ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.