Bigg Boss 13 : माहिरा आणि पारसचा Kissing Video होत आहे व्हायरल

या व्हिडिओमध्ये माहिरा नको म्हणत असतानाही पारस छाब्राने तिला किस केले आहे असं या व्हिडिओत दिसत आहे.

Bigg Boss 13 (Photo Credits: Facebook)

Bigg Boss हा रिऍलिटी शो नेहमीच भांडणांसोबत प्रेम प्रकरणांसाठी चर्चेत राहिला आहे.  Bigg Boss 13 मध्ये हिमांशी-असिम या जोडीनंतर आता माहिरा शर्मा आणि पारस छाब्रा यांच्यात देखील आता प्रेम फुलू लागलं आहे. बिग बॉसच्या एका फॅन पेजने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या व्हिडिओमध्ये माहिरा नको म्हणत असतानाही पारस छाब्राने तिला किस केले आहे असं या व्हिडिओत दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की थोडावेळ गप्पा मारल्यानंतर पारस तिला गालावर किस करतो. परंतु माहिरा पारसला विरोध करत असताना देखील पारस पुन्हा तिला किस करतो. असं केल्यावर माहिरा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते परंतु पारस तिला जवळ ओढतो आणि तिसऱ्यांदा किस करतो.

तसेच या पेजवर हा व्हिडीओ शेअर करताना ‘पारस- माहिरा एकमेकांच्या प्रेमात?’ असं कॅप्शन लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं.

परंतु, बिग बॉस फॅन्सनी मात्र हा व्हिडीओ पाहिल्यावर राग व्यक्त केला आहे. काहींनी हे फक्त नाटक असल्याचा म्हटलं आहे तर काहींनी या नव्या जोडीचं कौतुक करत ते खूप क्युट दिसत आहेत असं म्हटलं आहे.

काही प्रेक्षकांनी बिग बॉस या शोचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. हे प्रेक्षक म्हणाले की आता आम्हाला काय टीव्हीवर हे किसिंग सीन पाहावे लागणार का?



संबंधित बातम्या