Bigg Boss 13: आरती सिंग वर 13 व्या वर्षी तिच्याच घरात करण्यात आला होता बलात्काराचा प्रयत्न; पहा हा व्हिडिओ

ती 13 वर्षांची असताना तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला होता असं ती म्हणाली. हा प्रसंग ऐकताना, सर्वच स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी आले.

Arti Singh (Photo Credits: Twitter)

बिग बॉस 13 या शोमध्ये रोज नवा ड्रम पाहायला मिळत आहे. स्पर्धकांमधील भांडणं, काहींमध्ये वाढत चाललेला रोमान्स या सर्वामुळे शो अधिक रोमांचक होत चालला आहे. त्यात आणखी भर म्हणजे काल आणि आजच्या बिग बॉसच्या भागात दीपिका पदुकोण या अभिनेत्रीने छापाक या तिच्या चित्रपटानिमित्त बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. आज प्रदर्शित होणाऱ्या एपिसोड दरम्यान, बिग बॉस मधील सर्व स्पर्धक त्यांच्यावर ओढवलेले कठीण प्रसंग शेअर करताना दिसणार आहेत.

बिग बॉस 13 मधील स्पर्धक आरती सिंग हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. ती 13 वर्षांची असताना तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला होता असं ती म्हणाली. हा प्रसंग ऐकताना, सर्वच स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी आले.

पहा हा व्हिडिओ,

या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की आरती सिंग सांगते, "जेव्हा मी 13 वर्षांची होते तेव्हा मला घरात बंदिस्त करून विनयभंगासाठी जवळजवळ प्रयत्न केले गेले. आजही तो प्रसंग आठवून आजही मला थरथर कापायला होतं." आरतीने सांगितलेला हा प्रसंग ऐकून सिद्धार्थ शुक्लाला धक्का बसला.

शिवसेनेने अपमानास्पद वागणूक दिल्याचा अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा धक्कादायक खुलासा (Watch Video)

आरतीशिवाय इतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी देखील त्यांच्या आयुष्यातील वाईट अनुभव सांगितले आहेत. आरतीने यापूर्वी शोमध्ये असेही सांगितले होते की जेव्हा तिला काम मिळत नव्हते तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली होती. आरती म्हणाली होती, "मी मायका, वारिस या सारखे हिट शो केले होते. पण, तरीही मला कोणतीच ओळख मिळाली नाही. या दोन शोनंतर मी जवळपास दोन वर्षे घरीच होते कारण मला कोणतेच काम मिळाले नाही. आणि नंतर एक काळ असा आला जेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले."



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif