अभिनेता Nakuul Mehta नंतर आता 11 महिन्यांचा मुलगा Sufi ला Covid-19 ची लागणी; पत्नीही आढळली पॉझिटीव्ह

जानकी पुढे म्हणते, ‘त्यावेळी सूफीचा ताप 104.2 होता. 3 IVS लावले गेले, रक्त तपासणी करण्यात आली, RTPCR चाचणी करण्यात आली, सलाईन, अँटिबायोटिक्स आणि इंजेक्शन्स देण्यात आली, जेणेकरून त्याचा ताप कमी येईल. मी माझ्या मुलासोबत कोविड आयसीयूमध्ये संपूर्ण दिवस घालवला'

Nakuul Mehta, wife and son sufi (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा एकदा जगभर पाहायला मिळत आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे हजारो रुग्ण समोर येऊ लागले आहेत. टीव्ही आणि बॉलीवूडचे अनेक स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अलीकडेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेता, 'बडे अच्छे लगते हैं 2' फेम नकुल मेहताला (Nakuul Mehta) कोरोना व्हायरसची लागण झाली होती. आता माहिती मिळत आहे की, त्याची पत्नी आणि अवघ्या 11 महिन्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. नकुल मेहताची पत्नी जानकी पारेख हिने याबाबत माहिती दिली आहे.

जानकी पारेखने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा मुलगा सूफीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्यासोबत तिने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. जानकी पारेखने पोस्टमध्ये लिहिले की, 'तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की माझे पती 2 आठवड्यांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह आढळले. काही दिवसांनी माझ्यातही लक्षणे दिसू लागली. मी आजारी पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुफीला ताप आला. औषधे आणि पाण्याच्या पट्ट्या ठेवूनही उपयोग झाला नाही. त्यानंतर मध्यरात्रीच आम्ही त्याला रुग्णालयात नेले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Jankee Parekh Mehta (@jank_ee)

जानकी पुढे म्हणते, ‘त्यावेळी सूफीचा ताप 104.2 होता. 3 IVS लावले गेले, रक्त तपासणी करण्यात आली, RTPCR चाचणी करण्यात आली, सलाईन, अँटिबायोटिक्स आणि इंजेक्शन्स देण्यात आली, जेणेकरून त्याचा ताप कमी येईल. मी माझ्या मुलासोबत कोविड आयसीयूमध्ये संपूर्ण दिवस घालवला. अखेर 3 दिवसांनी त्याचा ताप उतरला. मुलाला हॉस्पिटलमध्ये एकटीने सांभाळताना मी प्रचंड थकून गेले होते. त्यावेळी मी देखील कोविड पॉझिटिव्ह होते.’ जानकीने आपल्या पोस्टमध्ये मुलाला सांभाळणारी आया व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. (हेही वाचा: Actor John Abraham आणी त्याची पत्नी Priya Runchal कोरोना पॉझिटीव्ह)

नकुल मेहताने 23 डिसेंबर रोजी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, त्याला कोरोना झाला आहे. दरम्यान, नकुलचा मुलगा सूफीवर त्याच्या जन्माच्या दोन महिन्यांतच शस्त्रक्रिया करावी लागली होती. मुलाला Bilateral Inguinal Hernia होता. डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. जानकी आणि नकुल मेहताचा मुलगा सूफीचा जन्म 3 फेब्रुवारी 2021 रोजी झाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now