Bigg Boss Marathi 2 Day 1 Episode Preview: बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्याच दिवशी शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचकुले मध्ये काहीतरी बिनसले, पाहा व्हिडिओ

बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्याच दिवशी अभिजीत बिचकुले आणि शिवानी सुर्वे यांच्यातील वाद

abhijeet bichkule-shivani surve(Photo Credits:Twitter)

'बिग बॉस मराठी 2'(Big Boss Marathi 2) चा ग्रँड प्रिमिअर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडल्यानंतर आजपासून सलग 3 महिने हा शो दररोज रात्री कलर्स वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ह्या शो मध्ये झालेल्या स्पर्धकांचे चेहरे पाहता यंदाच्या सीझनमध्येही फुल ऑन राडा पाहायला मिळणार ह्यात दुमत नाही. त्याची सुरुवात झालीय ती कवी मनाचा नेता अभिजीत बिचकुले(Abhijeet Bichkule) आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) ह्यांच्या भांडणाने. नुकताच ह्या भांडणाचा प्रोमो कलर्स वाहिनीवर प्रसारित होतोय. पाहा काय आहे प्रोमो मध्ये..

अभिजीत बिचकुले आणि शिवानी सुर्वे यांच्यातील वाद:

ह्या प्रोमोमधून ह्या घरात गटबाजी सुरु झालीय हे जरी स्पष्ट दिसत असले तरी, कोण कोणत्या गटात आहे ते आज हा शो पाहिल्यावरच कळेल. बिग बॉस मराठी 2 चे अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्कीच भेट द्या लेटेस्टली मराठी पेज ला.

बिग बॉस मराठी 2 पर्वाचे स्पर्धक कोण?

सुरेखा पुणेकर, वैशाली भैसने माडे, अभिजीत बिचुकले, किशोरी शहाणे विज, शेफ पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, माधवी जुवेकर, रूपाली भोसले, माधव देवचक्के, विद्याधर जोशी, शिवानी सुर्वे, शिवा ठाकरे, वीणा जगताप, नेहा शितोळे, दिगंबर नाईक अशा 15 सेलिब्रिटींची घरात एन्ट्री झाली आहे.

कलर्स मराठीवर 26 मेला या शोचा ग्रॅन्ड प्रिमियर पार पडला आहे. आता आजपासून पुढील 100 दिवस बिग बॉसच्या घरात हा खेळ रंंगेल.