'वेब सीरिजमध्ये दाखवली अल्पवयीन मुलांची अश्लील दृश्ये'; निर्माती Ektaa Kapoor आणि Shobha Kapoor यांच्याविरोधात POCSO कायद्याअंतर्गत तक्रार दाखल

मात्र, हा वादग्रस्त भाग सध्या या ॲपवर स्ट्रीमिंग होत नाही. फिर्यादीनुसार, अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रपट बनवताना आणि अश्लील संवाद साधताना दाखवण्यात आले होते.

Ekta Kapoor, Mother Shobha Kapoor (File Image)

निर्माती एकता कपूर (Ektaa Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ओटीटी प्लॅटफॉर्म 'अल्ट बालाजी'च्या (ALTBalaji) क्लास ऑफ 2017 आणि क्लास ऑफ 2020 या वेब सीरिजशी संबंधित आहे. यात अल्पवयीन मुलीसोबत आक्षेपार्ह दृश्ये असल्याचा आरोप आहे, त्यामुळे दोघीही आता कायदेशीर अडचणीत अडकल्या आहेत. बोरिवलीचे योग शिक्षक स्वप्नील रेवाजी यांनी 2021 मध्ये एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही सिरीज फेब्रुवारी 2021 ते एप्रिल 2021 दरम्यान प्रसारित करण्यात आली होती आणि त्यामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील दृश्ये चित्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यासोबतच वेब सीरिजमध्ये सिगारेटच्या जाहिराती वापरून महापुरुष आणि संतांचा अपमान करण्यात आला होता. त्यामुळे तक्रारदाराच्या भावना दुखावल्या आहेत. या तक्रारीनंतर आता एमएचबी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 295-A, आयटी कायद्याच्या कलम 13 आणि 15 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने याबाबत बोरिवली न्यायालयातही धाव घेतली आहे.

एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, अल्ट बालाजीवर प्रसारित होणाऱ्या सिरीजमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील दृश्ये दाखवण्यात आली होती. मात्र, हा वादग्रस्त भाग सध्या या ॲपवर स्ट्रीमिंग होत नाही. फिर्यादीनुसार, अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रपट बनवताना आणि अश्लील संवाद साधताना दाखवण्यात आले होते. वेब सीरिजमध्ये शाळेचा गणवेश परिधान केलेले कलाकारही अश्लील कृत्य करताना दाखवण्यात आले आहेत, ज्यामुळे मुलांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: 'Salman Khan ने नकळत चूक केली, त्यामुळे माफी मागणे योग्य नाही', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीवर Somy Ali चे मत)

या संपूर्ण प्रकरणावर एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. याआधी 27 सप्टेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोर्टाने मुलांशी संबंधित असभ्य मजकूर संदर्भात निर्णय दिला होता, ज्यामध्ये असे म्हटले आहे की लहान मुलांसोबत असा मजकूर तयार करणे, पाहणे आणि डाउनलोड करणे हा गुन्हा आहे. याआधी 2020 मध्येही एकता आणि तिची ही सिरीज वादात सापडली होती. 2020 मध्ये या मालिकेच्या एका सीझनमध्ये लष्कराविरुद्ध आक्षेपार्ह साहित्य दाखवल्याबद्दल एकताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif