Tumbbad Theatrical Re-release: 13 सप्टेंबरला 'तुंबाड' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचे नवीन पोस्टर जाहीर

चित्रपट चाहत्यांना आणखी उत्साहीत करण्यासाठी निर्मात्यांनी एक आकर्षक आणि भयानक नवीन पोस्टर रिलीज केले आहे.

Photo Credit- X

Tumbbad Theatrical Re-release: उत्कृष्ट कलाकृती म्हणून मराठी चित्रपट 'तुंबाड' (Tumbbad) हा मोठा गाजला. 2018 मध्ये 'तुंबाड' प्रदर्शित झाला होता. आता याच चित्रपटाचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. 'तुंबाड' चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यासंबंधीत पोस्टर रिलीज करून तारीख जाहीर केली आहे. त्याशिवाय, एक आकर्षक भयानक नवीन पोस्टर रिलीज केले गेले आहे. 'तुंबाड' चित्रपट 13 सप्टेंबर 2024 ला पुन्हा एकदा चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. या पुनरागमनामुळे चाहत्यांना आणि नवोदित प्रेक्षकांना या चित्रपटाचा पुन्हा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. 'तुंबाड' हा एक हॉरर (Horror Movie)मराठी चित्रपट  आहे. (हेही वाचा: Tumbbad च्या प्रीक्वल किंवा सिक्वल बाबत विचार सुरु; पाहा काय म्हणाला चित्रपटाचा निर्माता )

'तुंबाड'मधील जग काल्पनिक, पौराणिक, गावातील आहे. यात भय आणि काल्पनिक गोष्टीचे अनोखे मिश्रण असलेले कथानक आहे. रिलीज झाल्यानंतर 'तुंबाड' बॉक्स ऑफिसवर खुप यशस्वी झाला नव्हता. त्यावेळी प्रेक्षकांपर्यंत या चित्रपटाचे कथानक फारसे पोहोचले नव्हते. पण त्यानंतर ओटीटीवर आणि इतर ठिकाणी हा चित्रपट आल्यावर लोकांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक तज्ञ लोकांनी कौतुकही केले. सध्या चालणाऱ्या चित्रपटांपेक्षा 'तुंबाड' हा वेगळ्या आशयाचा चित्रपट होता.

'तुंबाड'ला 64 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आठ नामांकने मिळली आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन यासाठी पुरस्कार मिळवले. 75 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही तुंबाडचा प्रीमियर झाला होता, या महोत्सवात प्रदर्शित होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला. एक गुढ असलेला चित्रपट भयावह आहे. ही सृष्टीच्या जन्माची कथा आहे. सेन्याची नावे कसे मिळते? हे या चित्रपटात दाखवले आहे. चित्रपटाची कथा,संगीत, संवाद, छायांकन आणि संपूर्ण चित्रपट एक विलक्षण अनुभव आहे.

 13 सप्टेंबर 2024 ला पुन्हा चित्रपट गृहात होणार प्रदर्शित  

 

View this post on Instagram

 

A post shared by Sohum Shah Films (@sohumshahfilms)

या चित्रपटात सोहम शाह, पियुष कौशिक, हर्ष, अनिता दाते-केळकर, दीपक दामले, रुद्र सोनी, ज्योती माळशे, माधव हरी, रोंजिनी चक्रवर्ती यांनी त्यांची कला सादर केली आहे. अनिल बर्वे दिग्दर्शित, आनंद गांधी क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि आदेश प्रसाद यांनी सह-दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.