Bigg Boss Marathi 5 जिंकणाऱ्याला मिळणार लाखाचं बक्षीस; ट्रॉफी पाहून सदस्यांचा आनंद गगनात मावेना (Watch Video)
बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंत, अंकिता वालवलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पवार, जान्हवी किल्लेकर असं सहा फायनिस्ट जाहीर झाले आहे. या सदस्यांपैकी एक सदस्य आज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे.
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच संपणार आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंत, अंकिता वालवलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पवार, जान्हवी किल्लेकर असं सहा फायनिस्ट जाहीर झाले आहे. या सदस्यांपैकी एक सदस्य आज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे. बिग बॉसचा ग्रॅड फिनाले रविवारी पार पडणार आहे. पण यंदाच्या विजेत्याला बिग बॉसच्या घरातून काय मिळणार असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. नेमके किती बक्षीस रक्कम मिळणार आहे ? हे जाणून घ्या (हेही वाचा- बिग बॉस मराठी 5 मधील टॉप फायनालिस्ट; कोणाचा थांबला थोडक्यात प्रवास? घ्या जाणून)
ग्रॅंड फिनाले अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. एक सदस्य आज बिस बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे. नेमका हा सदस्य कोण असणार, त्यामुळे सहाही स्पर्धक चिंतेत आहे. बिग बॉस मराठी ५ जिंकण्यासाठी आजवर अनेक सदस्यांनी मेहनत घेतली होती. परंतू आता उरलेल्या पाच सदस्यांना खरी मेहनत घ्यावी लागणार आहे. जिंकणाऱ्या सदस्याला ट्रॉफीसहीत रोख रक्कम देखील मिळणार आहे.
बिग बॉस मराठी जिंकणाऱ्या सदस्याला काय मिळणार?
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपायला अवघ्ये दोन दिवस बाकी आहेत. विजेता म्हणून सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत या सदस्यांची नावे प्रेक्षकांच्या तोंडी आहे. यंदा जिंकणाऱ्या सदस्याला ट्रॉफी आणि २५ लाख रुपये रोख रक्कम दिला जाणार आहे.