Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात 'या' गायकाची होणार एन्ट्री, जगभरातं गाजलं होतं गाणं, सोशल मीडियावर चर्चा सुरु

यंदाचं बिग बॉस मराठीचं सुत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कालच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची पत्रकार परिषद पार पडली.

Bigg Boss 5 | Instagram

Bigg Boss Marathi 5: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यंदाचं बिग बॉस मराठीचं सुत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कालच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची पत्रकार परिषद पार पडली. हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले. 28 जुलै रोजी शोचा प्रीमियर होणार आहे. त्यामुळे शोमध्ये कोण कोण स्पर्ध झळकणार याची उत्सुकता लागली आहे. (हेही वाचा- Bigg Boss OTT 3 विरोधात अश्लीलतेची तक्रार, शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली - व्हिडिओ)

या संदर्भात अशी माहिती आहे की, बिग बॉस मराठी शोमध्ये छोट्या पडद्यावर मोठं नाव कमावणारा गायक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुलाबी साडीचा गायक संजू राठोड याची शोमध्ये धमाकेदार एन्ट्री होणार आहे. 28 जुलै पर्यंत चाहत्यांना हुरहुर लागणार आहे. संजूचे नाव समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाहा व्हिडिओ 

संजू राठोडचं गुलाबी साडी हे गाणं जगभरात प्रसिध्द झालं आहे. गुलाबी साडी गाण्याने सगळ्यांना वेड लावलं होते. एका गाण्यामुळे त्याचं आयुष्य बदले आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आहेत. बिग बॉसच्या घरात अनेक कलाकारांचे नावाच्या चर्चा सुरु आहेत. त्यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर याचं देखील नाव समोर आले आहे. त्यासोबत सोशल मीडियावर स्टार अंकिता वालावलकर हीची देखील शोमध्ये एन्ट्री करणार असल्याचे सांगत आहे.