ज्येष्ठ तेलुगू अभिनेते सत्यराज रुग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वी कोविड रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह 

कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सत्यराज घरी एकटे होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sathyaraj (Photo Credit - Instagram)

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणावरुन सिनेविश्वातील मोठ्या व्यक्तींना याचा फटका बसल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. केवळ बॉलीवूडच (Bollywood) नाही तर साउथ इंडस्ट्रीतील (South) अनेक बडे सेलिब्रिटी कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत परंतु सर्वांमध्ये सौम्य लक्षणे जाणवत आहेत. बाहुबली फेम ज्येष्ठ अभिनेते सत्यराज (Sathyaraj) यांचा कोरोनाचा अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्गज अभिनेते सत्यराज यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली, त्यानंतर त्यांची कोविड चाचणी झाली. कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सत्यराज घरी एकटे होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे 7 जानेवारी 2022 रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी न झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यानां कोरोनाची गंभीर लक्षणे जाणवू लागली आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. गेल्या काही दिवसांत तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. चित्रपट कलाकार महेश बाबू, मंचू मनोज, मंचू लक्ष्मी, संगीत दिग्दर्शक तमन, आणि अभिनेता विश्व सेन यांनाही या कोरोनाची लागण झाली आहे. (हे ही वाचा Coronavirus in Bollywood: लेखक, दिग्दर्शक प्रियदर्शनला कोरोनाची लागण.)

हिंदी भाषिक प्रेक्षक सत्यराज यांना त्यांच्या 'कटप्पा' या नावामुळे ओळखतात. एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' या चित्रपटात त्यांनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र. याआधीही सत्यराज यांनी तेलुगू इंडस्ट्रीत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. ते तेलुगूमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत घोषणा काय होते हे पाहणे बाकी आहे. त्याचे चाहते त्याच्या बरे होण्याची वाट पाहत आहेत.