Swatantra Veer Savarkar: महेश मांजरेकर यांच्या "Swatantra Veer Savarkar" या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा साकारणार विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आगामी बायोपिक 'स्वातंत्रवीर सावरकर' मध्ये सावरकर यांच्या मुख्य भुमिके मध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आगामी बायोपिक 'स्वातंत्रवीर सावरकर' मध्ये सावरकर यांच्या मुख्य भुमिके मध्ये दिसणार आहे. 'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपट जून 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर विविध ठिकाणी होणार आहे. सावरकरांचा बायोपिक 'स्वातंत्रवीर सावरकर' महेश मांजरेकर हे दिग्दर्शित करणार आहे.

वीर सावरकर बायोपिकची घोषणा सावरकरांच्या 138 व्या जयंतीनिमित्त करण्यात आली होती. चित्रपट निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला वेगळ्या स्पेक्ट्रमधून अधोरेखित करणार आहे.

मला या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. असे रणदीप हुड्डाने सांगितले. "असे अनेक नायक आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. तथापि, प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. विनायक दामोदर सावरकर हे दुर्लक्षित झालेल्या नायकांपैकी एक आहेत आणि प्रभावशाली आहेत आणि त्यांची कहाणी सांगायलाच हवी." असं रणदीप हुड्डा म्हणाले.

ही दुसरी वेळ आहे की रणदीप हुड्डा संदीप सिंगसोबत काम करणार आहे, त्यांचा पूर्वीचा 2016 मध्ये आलेला बायोपिक 'सरबजीत' होता. त्यामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते.

"'सरबजीत' नंतर 'स्वातंत्रवीर सावरकर' 'साठी संदीपसोबत काम करताना मला आनंद होत आहे. चित्रित करण्यासाठी ही आणखी एक आव्हानात्मक भूमिका असेल." "आम्ही जी कथा सांगायची आहे ती सांगायची ही योग्य वेळ आहे याअधि हे पात्र दुर्लक्ष केले होते. असे रणदीप म्हणाले.

"वीर सावरकर' हे एक दमदार पात्र आहे जे आपल्याला आपल्या इतिहासाची उजळणी समजून घेण्यास मदत करते.

मला संदीप सिंगसोबत काम करायचे आहे आणि हा चित्रपट आम्ही एकत्र करत आहोत याचा मला आनंद आहे." असं रणदीपने सांगितले.

रणदीपच्या अभिनयाचे कौतुक करतांना , निर्माता संदीप सिंग म्हणाले की , "भारतात असे खूप कमी कलाकार आहेत जे आपल्या प्रतिभेने जादू निर्माण करू शकतात आणि रणदीप त्यापैकी एक आहे.

वीर सावरकरांना भारतीय इतिहासात सर्वात वादग्रस्त म्हंटले गेले आणि त्यांच्या रोलसाठी सावरकरांचे पात्र डोळ्यासमोर ठेवले तर मी फक्त रणदीपचाच विचार करू शकतो."

संदीप सिंग पुढे म्हणतात, "वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येत नाही, मला आश्चर्य वाटते की आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वीर सावरकरांचा उल्लेख का नाही?"

मोशन पिक्चर्सचे निर्माते आनंद पंडित म्हणतात की, "सिनेमा हे एक सर्जनशील माध्यम आहे जे विविध विचारप्रक्रिया दाखवते. 'स्वातंत्रवीर सावरकर' सारखे चित्रपट अधिक आकर्षक सार्वजनिक संवाद निर्माण करण्यात मदत करतील." "महेश आणि रणदीप यांच्या नेतृत्वाखाली, मला खात्री आहे की, आम्ही प्रेक्षकांसाठी काहीतरी अविस्मरणीय बनवू",