Sushant Singh Rajput Suicide प्रकरणात मुंबई पोलिस दिशा भरकटवत असल्याचा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांचा आरोप
मुंबई पोलिस (Mumbai Police) अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्या प्रकरणात केवळ कलाकार व बड्या प्रोडक्शन हाऊसची नाव घेत तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा शब्दात सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी आरोप लगावला आहे
मुंबई पोलिस (Mumbai Police) गेल्या दीड महिन्यांपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र यात केवळ कलाकार व बड्या प्रोडक्शन हाऊसची नाव घेत तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा शब्दात सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी आरोप लगावला आहे. याचा सुशांतच्या कुटुंबाला त्रास होत असल्याने आता या प्रकरणाची पाटणा पोलिसांनी चौकशी करावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली नाही असेही सिंह यांनी सांगितले आहे. यानुसार तक्रार नोंदवून घ्यायला पाटणा पोलिस सुरुवातीला संकोच करत होते पण मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि मंत्री संजय झा (Sanjay Jha) यांनी त्यांना हे प्रकरण समजावून सांगितल्यावरआणि एफआयआर नोंदविला गेला आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) विरूद्ध, पटनातील राजीवनगर पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. रियावर, सुशांतला प्रेमात फसवून पैसे लाटणे व आत्महत्येस प्रवृत्त (Abetment of Suicide) केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तपासासाठी बिहार पोलिसांचे पथक मुंबई पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, सीआयडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
ANI ट्विट
दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 39 जणांचे जबाब नोंदवले आहेत. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. मात्र घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. परंतु काही लोक असे मानतात की, सुशांत बाहेरील असल्याने इंडस्ट्रीमधील काही लोकांनी त्याचे करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला. यालाच कंटाळून त्याने आत्महत्या केली.