Smriti Irani Rampwalk: जेव्हा स्मृती इराणी यांनी केला होता रॅम्प वॉक, पहा एकता कपूरने शेअर केलेला हा Throwback Video
एकता कपूरने अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात स्मृती इराणी या रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ 1998 सालचा आहे. यावेळी त्या अवघ्या 21 वर्षांच्या होत्या. स्मृती यांनी मिस इंडिया (Miss India) या स्पर्धेत भाग घेतला होता,
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) हे नाव मागील काळात राजकारणात प्रचंड गाजले आहे. मात्र या क्षेत्रात प्रवेश करण्याआधीच टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी आपली वेगळी आणि दमदार ओळख निर्माण केली होती. एकता कपूर (Ekta Kapoor) ची गाजलेली मालिका क्यूकी सास भी कभी बहू थी (kyuki Saas Bhi Kabhi Bahu Thi) मध्ये स्मृती यांचे तुलसी हे पात्र प्रत्येक घरात पोहचले होते. त्याच वेळेचा एक जुना व्हिडीओ एकता कपूरने अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात स्मृती या रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ 1998 सालचा आहे. यावेळी त्या अवघ्या 21 वर्षांच्या होत्या. स्मृती यांनी मिस इंडिया (Miss India) या स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हाच्या Introduction Round मधील हा व्हिडीओ आहे.या व्हिडिओ मध्ये सुद्धा स्मृती यांनी आपल्याला राजकारणात रस असल्याचे म्हंटले आहे.
एकता ने हा व्हिडीओ शेअर करताना आत्या खाली लिहिलेले कॅप्शन सुद्धा तितकेच खास आहे, यात स्मृती यांच्या कठीण काळाविषयी, मेहनती विषयी आणि मग मिळालेल्या यशाविषयी अगदी सुंदर शब्दात एकताने वर्णन केले आहे. एकता म्हणते की, "“माझी मैत्रीण, स्मृती इराणी यांनी मिस इंडियाचा किताब पटकावला नसला, तरी त्या प्रत्येक घराघरात पोहोचल्या. लोकप्रिय झाल्या. हे त्या लोकांसाठी आहे, ज्यांना वाटतं की यश सहज मिळतं. यश मिळवणं कठीण आहे. हे कठीण आहे, परंतु जे मेहनत करतात त्यांना यश नक्कीच मिळतं. स्मृती यांनी प्रत्येकाच्या घरात स्थान मिळवलं आणि आता त्या एक उत्तम मंत्री आहेत. ज्यावेळी त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं त्यावेळी त्या अत्यंत लाजाळू होत्या. मात्र आम्हाला खात्री होती की हिचं हसू सुद्धा अनेकांच्या मनावर राज्य करेल”.
स्मृती इराणी रॅम्प वॉक व्हिडीओ
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. स्मृती यांच्यात झालेल्या बदलाविषयी अनेक जण अगदी भरभरून बोलत आहेत. राजकारण आणि मनोरंजन या दोन अगदी वेगळ्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)