प्लास्टिक सर्जरीवर श्रुती हासन हिचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; पाहा काय म्हणाली?
श्रुती हासन हिच्या दिसण्यावरून नेटकऱ्यांनी तिला तिला ट्रोल केले होते. तसेच प्लास्टिक सर्जरीवरून (Plastic Surgery) नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे
बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) हिने बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. श्रुती हासन हिच्या दिसण्यावरून नेटकऱ्यांनी तिला तिला ट्रोल केले होते. तसेच प्लास्टिक सर्जरीवरून (Plastic Surgery) नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. यामुळे श्रुती हासन हिने आपल्या इंस्टाग्राम (Instagram) खात्यावरून एक पोस्ट केली आहे. यात पोस्टमधून तिने ट्रोलर्सचा समाचार घेतल्याचे समजत आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या प्लास्टिक सर्जरीविषयीसुद्धा सांगितले. महत्वाचे म्हणजे, प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तिच्याबदल लोकांची काय मत आहेत, याने तिला काहीच फरक पडत नसल्याचेही तिने सांगितले. ट्रोलर्सकडून राजकीय नेते, कलाकारांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. सध्या श्रुती हासन टोलर्सच्या जाळ्यात अडकल्याचे दिसत आहे.
श्रुती हासन ही कमल हासन यांची मुलगी असून 2009 साली तिने लक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तेव्हा तिची प्लास्टिक सर्जरी झाली होती. या चित्रपटानंतर तिने चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. इतक्या दिवस शांत असलेल्या श्रुती हासन तिच्या इंस्टाग्राम खात्यावर एक पोस्ट करून ट्रोलर्सला कडक शब्दात उत्तर दिले आहे. हे देखील वाचा- Sunny Leone च्या गावरान अदा पाहून चाहते झाले फिदा, फोटोला 10 लाखाहून अधिक लाइक्स, Watch Photos
श्रुती हासनची इंन्टाग्राम पोस्ट-
माझ्या याआधीच्या पोस्टनंतर मी हे लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याबद्दल लोकांची काय मते आहेत? याने मला फरक पडत नाही. पण सतत काही ना काही कमेंट करणे, आधी किती जाड होती? आणि आता किती बारीक झाली? हे सर्व दुर्लक्ष करण्यासारखे नाही. हे 2 फोटो मी 3 दिवसांच्या फरकाने काढले आहेत. मला जे म्हणायचे आहे ते काही महिलांना समजू शकेल, असा माझा विश्वास आहे. माझ्या मनावर आणि शरीरावर बऱ्याचदा हार्मोन्सचा प्रभाव असतो आणि गेल्या काही वर्षांपासून मी हार्मोन्सशी जुळवून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. पण हे काही सोपे नाही. त्या वेदना सहन करता येत नाही. शारीरिक बदल घडणे सोपे नाही. पण माझा प्रवास तुम्हाला सांगणे, मला अवघड वाटते. दुसऱ्या व्यक्तीबद्दल मत बनवण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि मत बनवणे हे अजिबात योग्य नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे की, हे माझे आयुष्य आहे. हा माझा चेहरा आहे. हो, मी प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि त्याची मला लाज वाटत नाही. त्या गोष्टीला मी प्रोत्साहित करतेय का, तर नाही…त्या गोष्टीच्या मी विरोधात आहे का.. तर नाही. मी असेच आयुष्य निवडले आहे, अशी पोस्ट श्रुती हासन हिने इंस्टाग्रामवर केली आहे.