शिवाजी महाराजांचा जन्म क्षुद्र शेतकरी घरात झाला होता, बिग बॉस फेम पायल रोहतगीचे वादग्रस्त विधान
बिग बॉस (Bigg Boss) हिंदीच्या सातव्या सीजनमध्ये राहुल महाजन (Rahul Mahajan) सोबतच्या केमिस्ट्रीमुळे पायल रोहतगी (Payal Rohtagi) हे नाव बरंच गाजलं होतं. अलीकडेच भारतीय समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (Raja ram Mohan Roy) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह्य विधानाने पायलचे नाव पुन्हा चर्चेत आले होते. इतकेच कमी म्हणून की काय पण आता तिने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) बाबतीत वादग्रस्त विधान केल्याचे समजत आहे. पायलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलेल्या एका पोस्ट मध्ये शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय वंशाचे नसून त्यांचा जन्म हा एका शूद्र गरीब शेतकरी घरात झाला असल्याचे म्हंटले आहे. यावरून पायलला नेटकऱ्यांचा रोष पत्करायला लागला असून काहीच वेळांनंतर तिला जाहीर माफी मागायची वेळ आली आहे.
पायल रोहतगी ट्विट
पायलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर केला होता. त्याखाली कॅप्शन देताना ‘शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला होता’ तिने म्हटलं आहे.. तिने ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरही ही पोस्ट शेअर केली आहे.१ जून ला ट्विटर वरून यासंदर्भात वक्तव्य केले होते, ज्यामध्ये "शिवाजी महाराज हे पूर्वीपासून क्षत्रिय नव्हते राज्याभिषेकासाठी त्यांनी विधिवत मुंज केली आणि आपल्या पत्नीशी पुनर्विवाह केला. यावरून असे सिद्ध होते की, त्याकाळी जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती. तुम्हाला एखादे कौशल्य अवगत असेल तर तुम्ही एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाऊ शकत होतात," असे पायलने म्हंटले आहे. वादग्रस्त Exit Poll Memes वर 'विवेक ओबेरॉय' ची माफी, ट्विटही हटवले
पण या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसताच पायलने घुमजाव करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांना दुखावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे माझे कुतूहल होते जे सोडवण्यायासाठी मी ही पोस्ट केली होती. शिवाजी महाराज हे एक महान हिंदू सम्राट होते. मात्र, या सगळ्यामुळे हिंदू समाजाच्या मनात असणाऱ्या त्यांच्या अढळ स्थानाला कधीही धक्का लागणार नाही. पंरतु, या गोष्टींवरून सिद्ध होते की, धर्माच्या नावाखाली अनेक वर्षे आपली दिशाभूल करण्यात आली, असे म्हणता पायलने मराठा आरक्षणावरही प्रश्न केला आहे.