शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी कन्यारत्न; Surrogacy मार्फत दुसऱ्यांदा मिळवलं मातृत्व
शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी सरोगसी (Surrogacy) च्या माध्यमातून पुन्हा एकदा पालकत्व मिळवले आहे
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्या घरी एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी सरोगसी (Surrogacy) च्या माध्यमातून पुन्हा एकदा पालकत्व मिळवले आहे. शिल्पाने नुकताच इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीचा पहिला फोटो आणि सोबतच ही खुशखबर आपल्या फॅन्स सोबत शेअर केली आहे. शिल्पाने आपल्या बाळाचे नाव समीशा (Samisha Shetty Kundra) असे ठेवले आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 22 नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं होतं. 21 मे 2012 मध्ये शिल्पाने विहानला जन्म दिला होता. त्यानंतर आता आठ वर्षांनी दोघांनी सरोगसीद्वारे पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला.बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हिच्याकडून कन्यारत्नाचे नामकरण; पहा का ठेवलं हेचं नाव
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शिल्पाने इंस्टग्राम वर समीशाचा फोटो शेअर करताना, 'ओम गणेशाय नमः आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळालं. आम्हाला हे सांगायला खूप आनंद होतो की आमच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. समीशा शेट्टी कुंदरा. समीशाचा 15 फेब्रुवारी 2020 ला जन्म झाला. आता घरात ज्यूनिअर एसएसके आली आहे.' आमच्या या नव्या पाहुणीला तुमचे खूप प्रेम द्या असे कॅप्शन दिले आहे. करीना कपूर खान आणि मुलगा तैमूर चा 'Baby Shark do do' गाण्यावरील क्युट डान्स सोशल मिडियावर व्हायरल, Watch Video
शिल्पा शेट्टी इंस्टाग्राम पोस्ट
दरम्यान, शिल्पा शेट्टी मध्यंतरी एका डान्स शो मध्ये परीक्षक म्ह्णून दिसली होती तर लवकरच ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करत सब्बीर खान दिग्दर्शित एका सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तिच्या युट्युब चॅनेलवर कुकींगचा शो ला देखील चांगला प्रतिसाद आहे.