Sapna Choudhary New Song 2020: सपना चौधरी चे नवीन गाणे 'बलम अल्टो' झाले सुपरहिट, Video मधील देसी अंदाज चाहत्यांना भावला

या गाण्यामध्ये सपना चौधरी हरियाणा चा सुपरस्टार नवीन नरु (Naveen Naru) याच्यासोबत थिरकताना दिसेल. या गाण्यामध्ये हे दोघे नवरा-बायको असल्याचे दिसत आहे. सपना हा या व्हिडिओमध्ये पूर्णपणे देसी स्टाईलमध्ये मिसळून गेली आहे.

Sapna Choudhary Song (Photo Credits: YouTube)

हरियाणामधील सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना घायाळ करण्यासाठी आपला नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. सपनाचे नवीन गाणे 'बलम अल्टो' (Balam Alto) युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. हा व्हिडिओ रिलीज होताच अवघ्या काही मिनिटांतच या व्हिडिओने 5 लाखांच्या वर लाइक्स मिळाले आहेत. इतकच नव्हे तर दहा लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओमधील सपना चौधरीचा देसी अंदाज चाहत्यांना आवडल्याचे दिसत आहे.

या गाण्यामध्ये सपना चौधरी हरियाणा चा सुपरस्टार नवीन नरु (Naveen Naru) याच्यासोबत थिरकताना दिसेल. या गाण्यामध्ये हे दोघे नवरा-बायको असल्याचे दिसत आहे. सपना हा या व्हिडिओमध्ये पूर्णपणे देसी स्टाईलमध्ये मिसळून गेली आहे. हरियाणाची स्टार डान्सर सपना चौधरीने गुपचूप उरकला साखरपुडा? जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा नवरा (Photos)

पाहा व्हिडिओ:

या गाण्यामध्ये नवीन सोबत लाँग ड्रायव्ह ला गेलेली सपना त्याच्या ड्रायव्हिंगवर नाराज होते आणि घरी आल्यावर ती त्याला काय सुनावते हे या गाण्यात दाखवले आहे.

या गाण्यामध्ये तुम्हाला पंजाबी बीट्स चा सुद्धा अनुभव घेता येईल. याचे Lyrics सुद्धा खूप सुंदर आहेत. हे गाणे वंदना जंगीर हिने गायिले आहे. तर नवीन विष्णु बाबा यांनी हे गाणे लिहिले आहे. इंटरनेटवर हे गाणे जबरदस्त सुपरहिट झाल्याचे चित्र दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement