'रामायण' मालिकेत भरतची भूमिका साकारणारे संजय जोग यांचा मुलगाही आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार ज्याने निर्मिती सावंत सोबत केले होते काम
रणजित जोग हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून सर्वांना परिचित आहे. आपले पणजोबा नाना जोग यांनी लेखन केलेल्या हॅम्लेट या नाटकात रणजीतने महत्वाची भूमिका बजावली आहे.
COVID-19 मुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन (Lockdown) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व देशवासिय घरात आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहे. अशा वेळी आपला घरातील वेळ चांगला जावा यासाठी अनेकांनी 80 च्या दशकात गाजलेली 'रामायण' ही मालिका पुन्हा सुरु करावी अशी मागणी सरकारकडे केली. या मागणीचा मान राखत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी ही मालिका पुन्हा सुरु केल्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच दूरदर्शन वाहिनीवर सुरु झालेली रामायण ही मालिका प्रेक्षक फारच पसंत करत आहे. या मालिकेतील राम- सीता या पात्रांसह भरतची भूमिका साकारणारे संजय जोग (Sanjay Jog) प्रेक्षक फार पसंत करत आहे. पण तुम्हाला माहित आहे संजय जोग इतकाच त्यांचा मुलगा देखील मराठीतील प्रसिद्ध कलाकार आहे. इतकच काय तर तो ही कलर्स वाहिनीवरील लक्ष्मीनारायण या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे.
संजय जोग यांच्या मुलाचे नाव आहे रणजित जोग (Ranjeet Jog). रणजित जोग हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून सर्वांना परिचित आहे. आपले पणजोबा नाना जोग यांनी लेखन केलेल्या हॅम्लेट या नाटकात रणजीतने महत्वाची भूमिका बजावली आहे. इतकच काय निर्मिती सावंत, अरुण नलावडे, कादंबरी कदम यांची प्रमुख भूमिका असलेला 'ही पोरगी कोणाची' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. 'रामायण'ने तोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम; स्टार प्लस, झी टीव्हीच्या मालिकांना मागे टाकून TRP मध्ये ठरला अव्वल
View this post on Instagram
Dont need one #happy#beingmyself#chill#thatsme
A post shared by Ranjeet (@ranjeetjog) on
त्यासोबत एक होतं पाणी, आव्हान, लपून-छपून यांसारख्या चित्रपटांसोबत नकळत सारे घडले, विवाहबंधन आणि सध्या कलर्सवर सुरु असलेल्या लक्ष्मीनारायण या मालिकेत काम केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेल्या रामायण या मालिकेने 2015 पासूनचे टीआरपीचे सर्व विक्रम मोडीत काढून या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. रामायणने स्टार प्लस, झी टीव्ही अशा अनेक वाहिन्यांच्या मालिकांना मागे टाकले आहे.