IPL Auction 2025 Live

Salman Khan Death Threat Case: सलमान खानला धमकी देत 5 कोटीची मागणी प्रकरणी 32 वर्षीय Bikaram Jalaram Bishnoi ला कर्नाटक मधून अटक

मंगळवारी विक्रम च्या अटकेनंतर बुधवारी बाबा सिद्दीकी खून खटल्यातील एका साक्षीदाराला 5 कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन आला आहे.

Salman Death Threat Case| File Image

मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी प्रकरणी कर्नाटक मधून Bikaram Jalaram Bishnoi ला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रूम वर धमकीचा मेसेज आला होता. 32 वर्षीय Bikaram Jalaram Bishnoi हा स्वतःला लॉरेंस बिष्णोई चा भाऊ सांगतो. राजस्थान मधील जलोर भागात त्यांच मूळ गाव असल्याची माहिती आहे.

सलमान खानला 5 नोव्हेंबरला Bikaram Jalaram Bishnoi कडून धमकी देण्यात आली आली होती. हा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये आला असून सलमानला जीवंत राहायचे असेल तर मंदिरात जाऊन माफी किंवा 5 कोटी रूपये खंडणी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याने ही मागणी पूर्ण न केल्यास आम्ही त्याला ठार मारू, आमची गॅंग़ अ‍ॅक्टिव्ह असल्याचं मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं. मुंबईत वरळी पोलिस स्टेशन मध्ये याबाबत FIR दाखल करण्यात आली आहे.

तपासामध्ये आरोपी कर्नाटकामध्ये असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर वरळी पोलिसांची टीम तेथे दाखल झाली. मंगळवारी उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील विक्रम बिश्नोई उर्फ ​​विक्रम हा वेल्डर म्हणून काम करत असताना त्याला अटक करण्यात आली आहे.  Salman Khan Death Threat: 'चूक झाली...'; सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी .

कॉलर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.