Sacred Games 2: गणेश गायतोंडे याच्या गुरुजींचे 'या' ठिकाणी आश्रम, चाहते देऊ शकतात भेट
या वेब सीरिजमधील गणेश गायतोंडेची (Ganesh Gaitonde) भुमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याला पुन्हा एकदा पाहून प्रेक्षक खुप खुश झाले आहेत.
नेटफ्लिक्स (Netflix) वरील सर्वात लोकप्रिय वेब सीरिज सेक्रेड गेम्स 2 (Sacred Games 2) दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजमधील गणेश गायतोंडेची (Ganesh Gaitonde) भुमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याला पुन्हा एकदा पाहून प्रेक्षक खुप खुश झाले आहेत. तसेच यामध्ये गुरुजींची भुमिका साकारणारा अभिनेता पंकज त्रिपाटी सुद्धा सध्या सेक्रेड गेम्सचा वेबसीरिजनंतर चर्चेत आहे.
गुरुजी गणेश गायतोंडे याला पौराणिक कथांच्या माध्यमातून आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत असतात. या मार्गाने गणेश गायतोंडे आयुष्यातील सर्व घटना पूर्ण करत असल्याचे यामध्ये दाखवण्यात आले आहे.
सेक्रेड गेम्स 2 मधील गुरुजी यांच्या उपदेशांसह त्यांचे आधुनिक पद्धतीचे आश्रम प्रेक्षकांच्या मनाला फार भावले आहे. या आश्रमाची रचना आणि तांत्रिक बाबी अतिशय अलदगपणे हाताळण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना हे आश्रम नेमके कुठे आहे हा प्रश्न पडला आहे.
मीडियाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, गुरुजींच्या आश्रमाबद्दल काही माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथे तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता. या आश्रमातील दृश्य ही दिल्ली मधील रोजेट हाउस (Roseate House) मध्ये शूट करण्यात आली आहेत. रोजेट हे एक पंचतारांकित लक्झरी हॉटेल असून ते इंदिरा गांधी विमानतळाच्या येथे आहे.
या वेब सीरिजमधील हॉटेलमधील पार्किंगची जागा, शानदार भिंती आणि फिरणारे दरवाजे या सर्व गोष्टींचे शूटींग करण्यात आले आहे.(Sacred Games 2 ला सुद्धा पायरसीचा फटका, Tamil Rockers वर सर्व एपिसोड उपलब्ध)
त्यामुळे जर तुम्हाला गुरुजींच्या या मॉर्डन आश्रमला भेट द्यायची असल्यास दिल्ली मधील रोजेट हाउसला जरुर भेट द्या.